Bhanudasrao Chavan College Lohara

Bhanudasrao Chavan College Lohara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhanudasrao Chavan College Lohara, College & University, https://goo.gl/maps/Wb1Aj8ivmNbRFPTWA, Lohara.

आजच आपला प्रवेश निश्चित करा...
15/05/2026

आजच आपला प्रवेश निश्चित करा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यनाने आयोजित '...
11/11/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यनाने आयोजित 'धाराशिव जिल्हा झोनल आंतरमहाविद्यालीन क्रीडा स्पर्धा ' मध्ये भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
1.ओमकार सगर... 100m रनिंग प्रथम
2. धम्मदीप कांबळे.... थाळी फेक.... प्रथम
3.अमर जाधव... भाला फेक.....प्रथम
....... लांब उडी.... तृतीय
4.ओमकार सगर, धम्मदीप कांबळे, अमर जाधव, सौरभ साळुंके, सम्यक सुरवसे..... 4×100 रिले.... प्रथम
5.प्रथमेश पाटील... 20 km चालणे....
6.सुजाता पवार.... 800m रनिंग... द्वितीय
वरील सर्व खेळाडूंची 'विद्यापीठ केंद्रीय झोनल ' स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी भव!
सर्वांचे अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!

29/09/2025

“एक दिन, एक घंटा, एक साथ”काल दिनांक २५/०९/२०२५ माननीय श्री.चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र र...
26/09/2025

“एक दिन, एक घंटा, एक साथ”

काल दिनांक २५/०९/२०२५ माननीय श्री.चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त 'एक दिन,एक घंटा,एक साथ' राष्ट्र स्वच्छता अभियान अंतर्गत live कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांचेसह सर्व विध्यार्थी, विध्यार्थिनी,रासेयो स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमास हजेरी लावली, त्यांचे विचार ऐकले व त्यांच्या बरोबर स्वच्छतेची शपथ घेतली.

भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरामराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव ...
26/09/2025

भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे आज दि. २४ सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त रासेयो कार्यमाधिकारी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) रामदास ढोकळे यांनी स्वयंसेवकांना रासेयोची पूर्ण माहिती सांगितली व रासेयो अंतर्गत नियमित कार्यक्रम तसेच विशेष वार्षिक शिबिरान्वये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली.

सर्व स्वयंसेवकांना जाणीव जागृती, रक्तदान, आपत्ती व्यवस्थापन, विविध रॅलीज, राष्ट्रीय साहस शिबीर, राष्ट्रीय एकात्मता शिबीर, राज्य व राष्ट्रीय पथ संचलन आणि उत्कर्ष या राज्यस्तरीय सामाजिक सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. डॉ. महानंदा मोरे यांनी गतवर्षी महाविद्यालयाने रासेयोच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती अधोरेखित करून स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त कार्यक्रमधिकारी प्रा. विनोद तुंगे यांनी केले व आभार डॉ. व्यंकट चिकटे यांनी मानले.

रासेयो दिनानिमित्त महाविद्यालयात श्रमदान व परिसर स्वच्छता मोहीम राबवून पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत रासेयो स्वयंसेवक, विध्यार्थी, विध्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रा.हनुमंत कलबुर्गे, प्रा.व्यंकटेश घोडके, प्रा.रूपाली कोटणूर, डॉ.संगिता सरवदे, प्रा.आर्या म्हमाणे, प्रा.प्रतिक्षा कदम, प्रा.ज्योती साठे, प्रा. ज्ञानेश्वर चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक अरविंद हंगरगेकर,अमर किर्तने, बालाजी जगताप, गोविंद जगताप,रोहित चव्हाण, दादा साठे, मनोज पवार, गणेश गरड इत्यादीनी परिश्रम घेतले.

*भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे शालेय   क्रिडा स्पर्धेत जिल्हा व विभागीय स्पर्धेत यश* भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्...
21/09/2025

*भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे शालेय क्रिडा स्पर्धेत जिल्हा व विभागीय स्पर्धेत यश*

भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय,लोहारा येथील विद्यार्थी चि.जन्मेजय मुकुंद जगताप यांची बॉक्सिंग या शालेय क्रीडा स्पर्धेत विभाग स्तरावर सुवर्णपदक पटकावले.त्याची महाराष्ट्र राज्यासाठी बॉक्सिंगसाठी निवड झाली आहे. व तसेच चि.श्रीधर क्षीरसागर यांची कुस्ती (ग्रीको,वजनी गट ५५) या प्रकारात धाराशिव जिल्हातून निवड होऊन विभागासाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री.सतीश इंगळे,प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे, उपप्राचार्य प्रा.हनुमंत कलबुर्गे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थ्यांना प्रा.मुंडे मॅडम,प्रा.विनोद तुंगे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा युवा महोत्सवात भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे घवघवीत यश...डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभ...
12/09/2025

जिल्हा युवा महोत्सवात भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे घवघवीत यश...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर आयोजित जिल्हा युवा महोत्सव जवाहर महाविद्यालय, अणदूर येथे 08 व 09 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. युवा महोत्सवामध्ये भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील संघांनी सुगम गायन, समूह गायन, मूक अभिनय, वक्तृत्व अशा विविध कला प्रकारांमध्ये भाग घेतला होता यामध्ये सुगम गायन या कलाप्रकारात कु. संस्कृती (B.Sc.F.Y.) माने हिने वैयक्तिक तृतीय क्रमांक पटकावला तर संस्कृती माने, भुजबळ सावित्री, पवार आकांक्षा, चव्हाण अंजली, कदम प्रज्ञा (सर्व B.Sc. F. Y.) यांच्या संघाने समूहगीतामध्ये तृतीय क्रमांक पटकावून युवा महोत्सवात महाविद्यालयास घवघवीत यश मिळवून दिले. भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने दोन पारितोषिक पटकावून युवा महोत्सवातील आपला दबदबा कायम राखला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस मा. आ. सतीश चव्हाण, अध्यक्ष प्रकाश सोळंके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ) रामदास ढोकळे, महाविद्यालयाचे युवा महोत्सव समन्वयक डॉ. व्यंकट चिकटे, युवा महोत्सव सह समन्वयक प्रा. ज्योती साठे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिनांक 21 जून 2025 रोजी भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे सर्वांच्या उपस्थितीत व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाल...
21/06/2025

दिनांक 21 जून 2025 रोजी भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे सर्वांच्या उपस्थितीत व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली "आंतरराष्ट्रीय योग दिवस" साजरा करण्यात आला.महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते.या योग दिनानिमित्त योगगुरु म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे हे होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वजण उपस्थित राहून योगगुरु माननीय डॉ.रामदास ढोकळे यांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला व सर्वांनी शिकवलेले योग आनंदाने पूर्ण केले.यावेळी प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे यांनी सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले...

आज आपला प्रवेश निश्चित करा...
17/05/2025

आज आपला प्रवेश निश्चित करा...

12/09/2024
आज महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे ( १७ ते १९ वयोगट मुले व मुली) आयोजन करण्यात आले होते. स्पर्धे...
10/09/2024

आज महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे ( १७ ते १९ वयोगट मुले व मुली) आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील क्रीडा शिक्षक श्री. सोमवंशी एम. डी. (आष्टा), श्री. क्षीरसागर व्ही. एन. (कानेगाव), श्री. कवाळे व्ही. एम. (भातागळी), श्री. सुतार डी. एस. (लोहारा), श्री. जाधव एस. जी. (माकणी), श्री. पाटील बी. व्ही. (जेवळी), पंच श्री. रोहन जगताप (भातागळी) यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

Address

Https://goo.gl/maps/Wb1Aj8ivmNbRFPTWA
Lohara
413608

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhanudasrao Chavan College Lohara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Bhanudasrao Chavan College Lohara:

Share