15/08/2023
#डॉ_सुभाषचंद्र_राठी_बालक_विद्या_मंदिर
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन_उत्साहात_साजरा
🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺
बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेत आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजगोपालजी तोष्णीवाल साहेब उपस्थित होते तर व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्री सचिन भाऊ तोष्णीवाल श्री वसंत शिंदे साहेब,सैनिक बालाजी शिंदे, श्री प्रदीप फाले,मुख्याध्यापक श्री गजानन तिखे सर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री कदम सर हे उपस्थित होते.
प्रतिमा पूजनानंतर ध्वजारोहण करण्यात आले तत्पूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण केले. याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित विविध तालुकास्तरीय स्पर्धा मध्ये पारितोषिक मिळवून शाळेचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय शाळेत विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी देशभक्तीपर भाषण विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच देशभक्ती गाण्यावर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री गजानन तिखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक वर्गांनी परिश्रम केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला वर्गासह पालक उपस्थित होते.शाळेत आयोजित सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला.
िंद🇮🇳🌺🌺
🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳🌺🇮🇳