Indira Institute of Technology-Polytechnic Vishnupuri Nanded

  • Home
  • Indira Institute of Technology-Polytechnic Vishnupuri Nanded

Indira Institute of Technology-Polytechnic Vishnupuri Nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Indira Institute of Technology-Polytechnic Vishnupuri Nanded, College & University, Vishnupuri, .

21/05/2026
सहयोग सेवाभावी संस्था इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक मधील विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या विविध उद्योग ...
13/05/2026

सहयोग सेवाभावी संस्था इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक मधील विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या विविध उद्योग व औद्योगिक संस्थांना भेटी

*विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यासाठी इंदिरा पॉलीटेक्निकचा पुढाकार*नांदेड : सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा ...
13/05/2026

*विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये देण्यासाठी इंदिरा पॉलीटेक्निकचा पुढाकार*
नांदेड : सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक, विष्णुपुरी, नांदेड या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्ये प्राप्त व्हावीत या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे येथील PHN Technology Pvt. Ltd. या नामांकित तंत्रज्ञान कंपनीसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून महाविद्यालयात अत्याधुनिक टेक्नॉलॉजी लॅब स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कराराअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना Artificial Intelligence (AI), Internet of Things (IoT), Robotics, Embedded Systems, Automation, Drone Technology तसेच Industry 4.0 यांसारख्या आधुनिक व उदयोन्मुख तंत्रज्ञान विषयांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची आणि आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे.
PHN Technology Pvt. Ltd. च्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, तांत्रिक कार्यशाळा, सेमिनार तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना IIT, ISRO, Skill India आणि NSDC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी संलग्न प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी संबंधित इंटर्नशिप, लाइव्ह प्रोजेक्ट्स तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे.
या तंत्रज्ञान प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार असून त्यांची रोजगारक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमास सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे, प्राचार्य डॉ. ईशान अग्रवाल, प्राचार्य शिवानंद बारसे PHN Technology Pvt. Ltd. च्या प्रतिनिधी हर्षदा जोंधळे उपस्थित होते. PHN प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देत उद्योग-शिक्षण सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले.
पुढील शैक्षणिक वर्षापासून ही टेक्नॉलॉजी लॅब कार्यान्वित होणार असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

सहयोग एज्युकेशनल कॅम्पस मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरान...
17/09/2025

सहयोग एज्युकेशनल कॅम्पस मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
नांदेड : सहयोग एज्युकेशनल कॅम्पस तर्फे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवर पाहुणे मा. धारोजीदादा हंबर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास सहयोग शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य डॉ. गिरगांवकर, श्री शिवानंद बारसे, डॉ. ईशान अग्रवाल,डॉ. जाधव, श्री. सुनील पांचाळ, डॉ. नवघरे, श्री. विक्रम ढोणे, स्वामी सर तसेच सहयोग कॅम्पसचे विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाची आठवण करून देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण केले.

Address

Vishnupuri

431606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indira Institute of Technology-Polytechnic Vishnupuri Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your university to be the top-listed University?

Share