GURUKUL-School to Career

GURUKUL-School to Career RIGHT CENTER OF ALL THE CARES FOR CAREER IS GURUKUL-SCHOOL TO CAREER...!!!

Do you wish to have all these for your wards?
-100% Cultural (Sanskar) Atmosphere
- Yoga, Pranayam, Meditation
- Complete Study with Homework and Sufficient Time for Hobby and Play
- No Homework, No Assignments from Home
- No Load of School Bags

15/05/2019
काय ? नोकरी / व्यवसायामुळे खूप अडकलेले आहात ?काय ?  मुलं मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया मध्ये अडकलीत ?
14/05/2019

काय ? नोकरी / व्यवसायामुळे खूप अडकलेले आहात ?
काय ? मुलं मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया मध्ये अडकलीत ?

13/05/2019

गुरुकुल कार्यपद्धती

गुरुकुल ही प्राचीन भारतीय, आदर्श शिक्षण पद्धती होय. केवळ नोकरी मिळवून देणारे शिक्षण देण्यापेक्षा माणूस बनवणारे शिक्षण आज गरजेचे बनले आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल तो सुजन चारित्र्यवान जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरेल यासाठी गुरुकुल शिक्षण पद्धतीची आज नितांत गरज आहे. शिक्षण हे विद्यार्थ्याला ज्ञानार्थी आणि आधुनिक बनवण्यासाठी असले पाहिजे.
सध्याच्या शिक्षण पद्धतीत मूल्य शिक्षणाचा अभावामुळे गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून भ्रष्ट मानसिकता व अनैतिकता यांचा विस्फोट झाला आहे. गुरुकुल पद्धतीत मूल्यशिक्षणला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वेदात म्हटल्यानुसार आत्मशोध हाच शिक्षणाचा उद्देश आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात.

शिक्षण म्हणजे मनुष्यात आधीच माहीत असलेल्या परिपूर्णतेची अभिव्यक्ती होय .

परंतु सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी ज्ञानार्थी नाहीतर परीक्षार्थी झालाय. त्याचा बुद्ध्यांक जरी वाढला असणार, मात्र त्याची वैचारिक क्षमता दुर्बल झाली आहे.

मग कसे काय विद्यार्थी परिपूर्ण बनेल?

कसा काय त्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल?

त्यामुळे गुरुकुलात विद्यार्थ्याला परिपूर्ण बनविण्यासाठी यथोचित सर्व प्रयत्न केले जातात. जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल. त्यांना नेमका त्यांच्या दडलेला गुण कोणता आहे ? हे छंद , अभ्यासातून अशी आदर्श उपायोजना या गुरुकुल पद्धतीत आहे.

आजची विद्यार्थ्याची दिनचर्या साधारणपणे अशी असते.
* 5 ते 6 तास शाळा
* 2 ते 3 तास ट्युशन क्लासेस
* 3 तास आंघोळ नाश्ता जेवण
* 2 तास टीव्ही मोबाइल
* 1.30 शाळेत ट्युशनला जाणे येणे यासाठी खर्च होतात.

यातून मुलांना स्वतःसाठी स्वतःच्या आवडीसाठी वेळ कसा मिळणार ?

महागाईमुळे पालक पैसे कमावण्यासाठी नोकरी व्यवसायामध्ये गर्क असतात.

उत्तम शाळा, सोबत ट्युशन्स लावून दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असे पालक समजतात.

IQ INTELLIGENT QUOTIENT

EQ - EMOTIONAL QUOTIENT

SQ - SPIRITUAL QUOTIENT

MQ - MATERIAL QUOTIENT

आता हे पिलर्स कसे मजबूत होतात हे आपण पाहू.

संस्था सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 6.30 वाजता ग्राउंड वर
हजर करते.

6.30 ते 8.30 वाजेपर्यंत व्यायाम सूर्य नमस्कार, योगा प्राणायाम यासाठी गुरुकुल विद्यार्थ्यांवर मेहनत घेते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक विकास या माध्यमातून होतो. त्यानंतर 8 ते 9 हा वेळ विद्यार्थ्यांना अंघोळ व नाश्ता यासाठी देण्यात येतो.

स. 9 ते दु. 12 .45 या वेळात शालेय अभ्यासक्रम संस्थेच्या तज्ञ शिक्षकांसोबत पूर्ण केला जातो.

दु.12:45 ते 1.30 हा वेळ भोजन व विश्रांतीसाठी देण्यात येतो.

त्यानंतर दु. 1.30 ते 3 पर्यंतचा विद्यार्थ्यांना गृहपाठासाठी दिला जातो त्यामुळे त्यांचा IQ मजबूत होतो.

दु. 3 ते 4 हा वेळ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल व करिअर विषयी माहिती दिली जाते.

या नंतरचा 4 ते 5 हा वेळ होतो गुरुकुल वैशिष्ट्याचा म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वतः अस्तित्व शोधण्याचा शोध. म्हणजेच त्यांचा आवड आणि छंद यासाठी दिला जातो.

त्यानंतर विद्यार्थी 5 ते 6.30 मैदानावर जातात.

अशाप्रकारे गुरुकुलाचे बारा तास संपतात. यानंतर निवासी विद्यार्थी गुरुकुलाच्या निवासस्थानी करतात, तर अनिवासी विद्यार्थी त्यांच्या घरी जातात.

अधिक माहिती घ्यायची आहे त्यासाठी सोबतचा व्हिडिओ पहा. प्रत्यक्ष भेट द्याआमच्या प्रकल्पाला.
विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज बघा अजून असेच व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्या मोबाईलवर उपलब्ध व्हावेत असं वाटतं ना ?

त्यासाठी सोबत चा फॉर्म भरा.

https://bit.ly/2YhLPcf

धन्यवाद !

Address

242/25, Pradhikaran
Nigdi
411044

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when GURUKUL-School to Career posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share