BDP College,Parwa

BDP College,Parwa Babasaheb Deshmukh Parwekar Mahavidyalaya, Parwa ta. Ghatanji Dist Yavatmal is single faculty B. A. college.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाम येथे फिरते ग्रंथालय या वाचन प्रकल्पाचे उद्घाटनबाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय  पारवा...
28/04/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाम येथे फिरते ग्रंथालय या वाचन प्रकल्पाचे उद्घाटन
बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी सांगितलेल्या ग्रंथालय सूत्रांपैकी १) ग्रंथ हे उपयोगा करिता आहे. २) प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळाला पाहिजे ३)प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे. या त्रिसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील सुट्ट्यात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देता यावी, त्यांना वाचण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांना नियमित वाचनाची सवय लागावी. या करिता महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांच्या संकल्पनेतून (लायब्ररी ऑल व्हील) फिरते ग्रंथालय या वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाम येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे तर या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा . डॉ. संदीप अग्रवाल, तर प्रमुख उपस्थिती सरपंच श्री रमेशची सीडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुक्तियारजी शेख ,श्री बाळकृष्ण वाढई , शाळेतील सहाय्यक शिक्षिका सुप्रिया काकडे ,कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप देसाई उपस्थित होते. आपल्या उद्घाटनने भाषणात डॉ. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने आयोजित केलेला. फिरते ग्रंथालय हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच वाचनाची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती टिकून राहील आणि विद्यार्थी हा अधिक वाचनाभिमुख होईल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त करून या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मेंद्र तेलगोटे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाबद्दलचे महत्त्व आणि वाचनाने माणूस कसा घडत असतो याविषयी विविध उदाहरणे देऊन, पुस्तक वाचण्याचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले. तर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुक्तियारजी शेख यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे फायदे सांगून त्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचबरोबर जाम गावचे सरपंच श्री रमेशजी सीडाम यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोगी आहे याचे महत्त्व सांगितले व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जाम येथील वर्ग पहिली ते पाच पर्यंतचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील सुट्ट्यात महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेले बाल साहित्य/ गोष्टींची पुस्तके फिरते ग्रंथालय या वाचन उपक्रमा मार्फत तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यात वाचन अभिरुची निर्माण करण्याचा उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता शाळेतील इतर शिक्षक तसेच महाविद्यालय कर्मचारी श्री दिलीप इंगोले, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'ओळख योग प्राणायामाची' प्रशिक्षण शिबिराचा समारोप : स्थानिक बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्...
13/04/2026

'ओळख योग प्राणायामाची' प्रशिक्षण शिबिराचा समारोप : स्थानिक बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने 'ओळख योगप्राणायामाची' या प्रकल्पांतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराचा समारोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथे झाला. बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जांब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा शारीरिक क्षमतेचा विकास होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प सुरू केले आहे. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकत्यार शेख, ग्रामपंचायत सरपंच रमेश सिडाम, ग्रामपंचायत सदस्य संगीता चौधरी, पोलीस पाटील लता आत्राम, अंगणवाडी सेविका योगिता कुडमते, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामकृष्ण वाढई, महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. जगदीश हेंडवे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता नन्नावरे, सहाय्यक शिक्षिका सुप्रिया काकडे, आणि महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अभय चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रार्थना व पाहुण्यांच्या स्वागता नंतर समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक या प्रकल्पाचे समन्वय प्रा.डॉ.अभय चांदेकर यांनी केले. दिनांक 6 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 दरम्यान सकाळी साडेसात ते नऊ या वेळेमध्ये प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्थितीतील वीस आसने प्रात्यक्षिकासह महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकत्यार शेख यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षण शिबिरा बाबत समाधान व्यक्त करून महाविद्यालयाचे आभार त्यांनी मानले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी समायोजित विचार व्यक्त करून प्रशिक्षणार्थींची अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात योगासनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला तसेच समाजाचा विकास साधावा व आपल्या जीवनामध्ये आसन प्राणायाम किती महत्त्वाचे आहे हे वेगवेगळे उदाहरण देऊन पटवून देत प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण शिबिरामध्ये शिकवण्यात आलेल्या आसनांचे संगीताच्या तालावर प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले. या कार्यक्रमादरम्यान शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना तसेच प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा ज्यामध्ये कू. अश्विनी पेटकुले, अनुजा प्रधान, दुर्गा शेंडे, आचल वाढाई, ऐश्वर्या गंधश्रीवार, नंदिनी गुरनुले यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिबिराविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नंदिनी गुरनुले आभार दुर्गा शेंडे यांनी मानले. प्रशिक्षण शिबिर यशस्वी ते साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. अभय चांदेकर यांच्या नेतृत्वात तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकत्यार शेख शाळेच्या मुख्याध्यापिका नीता नन्नावरे, सहाय्यक शिक्षिका सुप्रिया काकडे तसेच गावकऱ्यांची मोलाचे सहकार्य लाभले.

पारवेकर महाविद्यालयाच्या वतीने ओळख योग - प्राणायामाची या प्रकल्पाचे उद्घाटन : पारवा : बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्या...
07/04/2026

पारवेकर महाविद्यालयाच्या वतीने ओळख योग - प्राणायामाची या प्रकल्पाचे उद्घाटन : पारवा : बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिपेश्वर ( पुनर्वसित गाव) येथील शाळेमध्ये ओळख व्यायामाची, ओळख योग - प्राणायामाची, ओळख जुडो कराटेची हे उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे यांच्या मार्गदर्शनात व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अभय चांदेकर यांचे नेतृत्वात यशस्वीपणे राबविल्या गेले. यावर्षी सत्र 2025 - 26 पासून पुढील तीन वर्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब येथील शाळेमध्ये हे तिन्ही प्रकल्प राबवायचे आहे. यावर्षी ओळख योग - प्राणायामाची या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. विद्यार्थ्यांचा शारीरिक क्षमतेचा विकास होऊन त्यांची रोगप्रतिकार शक्ती वृद्धिगत व्हावी या उद्देशाने हे प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या बी.ए.भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी कु. नंदिनी गुरनुले, कु. अश्विनी पेटकुले, अनुजा प्रधान, दुर्गा शेंडे, आचल वाढई, ऐश्वर्या गंधश्रीवार या विद्यार्थिनी प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे हे होते. तर उद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकत्यार शेख उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगदीश हेंडवे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता नारनवरे, सहाय्यक शिक्षिका सुप्रिया काकडे तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अभय चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून झाली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर या प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविकामध्ये डॉ. अभय चांदेकर यांनी दिनांक 6 एप्रिल ते 11 एप्रिल 2026 दरम्यान सहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये उभ्या स्थितीतील पाच आसने, बसल्या स्थितीतील पाच आसने, पोटाच्या आधारावरील पाच आसने, व पाठीच्या आधारावरील पाच आसने असे एकूण 20 आसने या प्रशिक्षण शिबिरामध्ये सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये प्रात्यक्षिकास शिकविल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या उद्घाटकीय भाषणात मुकत्यार शेख यांनी या शिबिराचे उद्घाटन झाले असल्याचे सांगून अशा प्रकारचे प्रकल्प शाळेमध्ये राबविण्यात येत असल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त करून महाविद्यालयाचे आभार त्यांनी मानले. याप्रसंगी डॉ.जगदीश हेंडवे, मुख्याध्यापिका नीता नारनवरे, सहाय्यक शिक्षिका सुप्रिया काकडे यांनी समायोजित भाषण करून या प्रशिक्षण शिबिरासाठी शुभेच्छा विद्यार्थ्यांना देऊन पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अशा प्रकारचे प्रकल्प सातत्याने व नियमित चालू असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग प्राणायामाच्या माध्यमातून आपला सर्वांगी न विकास करून घ्यावा व शिबिरातून मिळालेली माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी करीत या प्रशिक्षण शिबिराला शुभेच्छा त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन कु. नंदिनी गुरनुले , तर आभार दुर्गा शेंडे हिने मानले

बाबासाहेब देशमुख पारेकर महाविद्यालय पारवाच्या व्यवसाय व मार्गदर्शन विभाग, करिअर कट्टा व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्य...
30/03/2026

बाबासाहेब देशमुख पारेकर महाविद्यालय पारवाच्या व्यवसाय व मार्गदर्शन विभाग, करिअर कट्टा व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास व रोजगार संधी हा कार्यक्रम संपन्न. महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थी हे ग्रामीण भागातील व होतकरू असल्याने व नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये रोजगार व कौशल्य विकसित करता यावे, विद्यार्थ्यांना व्यवसाय व रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे,प्रमुख मार्गदर्शक तेजश्री कडू मॅडम, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण ,संस्था यवतमाळ. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. संदीप अग्रवाल, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय कु. नंदिनी गुरनुले हिने करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संदिप देसाई यांनी केले.त्यांनी व्यवसाय व मार्गदर्शन विभाग व करियर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे प्रा .डॉ. संदीप अग्रवाल यांनी आपल्या मनोगतात व्यवसायातून सुखी आणि समृद्ध कसे होता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक कुमारी तेजश्री कडून मॅडम, यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकास रोजगार संधी या विषयातून, विद्यार्थ्यांना व्यवसाय व रोजगार संधी कुठे आणि कशी उपलब्ध आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळवता येईल, विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम आणि त्यातून व्यवसाय कसा उभा करावा व आर्थिक भाग भांडवल उभे करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पुजा भुरे, शिवानी मारोतकर यांनी,ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय सुरू केला त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी व्यवसायातून विद्यार्थ्यांना समृद्ध आणि सुखी व्हायचे असेल तर त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे संचालन कु. दीक्षा जाधव हिने केले तर आभार कु. रक्षा आदेवार हिने मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक , शिक्षेक्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न. स्थानिक बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पा...
30/03/2026

बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
स्थानिक बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा येथे जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए.पी.आय प्रणिती लांजेवार- देसाई पांढरकवडा आणि जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा वाढोणा येथील सहाय्यक शिक्षिका कुसुम गद्दलवार या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून आपल्यातली गुणवत्ता सिद्ध करावी आणि त्या गुणवत्तेला योग्य आकार द्यावा तसेच या स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन ए.पी.आय प्रणिती लांजेवार -देसाई यांनी केले. तर सहाय्यक शिक्षिका कुसुम गद्दलवार यांनी विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईलच्या आणि व्हाट्सअप च्या युनिव्हर्सिटी मध्ये गुंतून न पडता यामधून आपल्याला जे आवश्यक आहे ते आपण आत्मसात करून आपण आपल्या विकास केला पाहिजे आणि स्वतःला आणि समाजाला साजेसे ज्ञान घेतले पाहिजे ,आपली उन्नती केली पाहिजे असे मत या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केले. तर सायबर क्राईम व मोबाईल तसेच सध्या भारतात, महाराष्ट्रात आणि जगात मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे आणि इतरही सायबर क्राईम होताना दिसत आहेत. अशा या मोबाईलच्या जगात आपण योग्य तो मार्ग निवडून आपल्यातील क्षमता सिद्ध करून आपण योग्य त्या मार्गाने मार्गक्रमण करून आपले अस्तित्व निर्माण करावे आणि आपणासही आपल्या आई-वडिलांचे समाजाचे आणि महाविद्यालयाचे नावलौकिक करावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.जगदीश हेंडवे यांनी केले .तर कु. अश्विनी पेटकुले हिने संचालन व आभार सिनम शेख हिने मानले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रक्षा यादव ,नंदिनी गुरनुले, माहिन शेख ,पल्लवी पवार, समीक्षा भोयर, मोनिका मोहुरले, वैजयंती चौधरी , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणूस व सुजान नागरिक घडविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना: प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटेबाबासाहेब देशमु...
05/03/2026

माणूस व सुजान नागरिक घडविण्याचे उत्तम माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना: प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे
बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारव्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय शिबिर दिनांक 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान संपन्न झाले. या सात दिवशीय शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे होते. तर डॉ. राहुल खंडारे प्राचार्य श्री. बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा, श्री. सुनील ठाकरे मुख्याध्यापक आबासाहेब पारवेकर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पहापळ आणि श्री. मोरेश्वर सरोदे, मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येळाबारा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने व विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत कुमारी आचल वाढई व ऐश्वर्या गंधश्रीवार यांच्या सुमधुर स्वागत गीताने करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमात शिबिरातील रुपेश लामतुरे, अश्विनी पेटकुले, आचल प्रधान, पुनम शेंडे , समिक्षा भोयर, नंदिनी गुरनुले, सागर खटाळे, पल्लवी पवार इत्यादी स्वयंसेवकांनी आपले शिबिरातील अनुभव कथन केले. श्री सुनील ठाकरे सर यांनी श्रद्धा व शक्ती याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर श्री मोरेश्वर सरोदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, कुशल नेतृत्व, कर्तुत्व व कार्यक्षमता अशा प्रकारच्या शिबिरातून शिकता येते असे प्रतिपादन केले. तर प्राचार्य डॉ.राहुल खंडारे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तम माध्यम आहे असे विचार व्यक्त केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे माणूस व सुजाण नागरिक घडविण्याचे उत्तम माध्यम आहे असे आपल्या अध्यक्षिय भाषणात आपले विचार व्यक्त केले.
या सात दिवशीय शिबिरामध्ये तरोडा पोड आणि जगदंबा मंदिरातील संपूर्ण ग्राम स्वच्छता करण्यात आली. गावामध्ये जलसाक्षरता, स्वच्छता, स्त्री पुरुष समानता, स्त्री सक्षमीकरण याविषयी जनजागृती दिंडी काढण्यात आली. तसेच तरोडा पोड ते तरोडा गावातील प्रमुख मार्गाने वृक्षदिंडी काढण्यात येवून पर्यावरणाविषयी जागृती वृक्षदिंडीच्या माध्यमातून केली. या दोन्ही दिंडीला गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळून ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले .राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी तरोडा पोड येथील 53 कुटुंबांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वे करण्यात आला.तरोडा पोड येथे 25 घरी चिकू फणस आणि लिंबू इत्यादी फड वृक्षांची लागवड करण्यात आली. हे फळ वृक्ष संवर्धन करण्याचे त्या त्या कुटुंबांनी आश्वासन दिले. याशिवाय दुपारच्या सत्रामध्ये बौद्धिक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये श्री अमित कुलकर्णी , नवी उमेद पांढरकवडा यांनी जलसाक्षरता व जलसंधारण, प्रा. नंदूकिशोर गव्हाणे यांनी जागर संविधानाचा, माननीय श्री .अशोक चरडे व श्री .रमेश देशट्टीवार यांनी व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व गुण तर कु. शीतल ठाकरे यांनी विकसित भारत आणि पर्यावरण इत्यादी विषयावर उपस्थित स्वयंसेवकांना व गावकऱ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील प्रा. डॉ. गजानन लोहवे, प्रा.डॉ. लक्ष्मण यादव,प्रा. डॉ. संदीप अग्रवाल, डॉ, अभय चांदेकर ,डॉ. संदीप देसाई, श्री अजय पांचाळ, श्री अरविंद जिडडीवार ,श्री दिलीप इंगोले, श्री विलास काकडे ,श्री राजू नगनुरवार, श्री स्वामी गज्जलवार, राहुल आडे, कु. पल्लवी पवार, रक्षा आदेवार, अश्विनी पेटकुले, माहिन शेख, निखिल रेड्डीवार, शुभम गोलकोंडावार तसेच शिबिरातील स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी करिता परिश्रम घेतले. समारोपय कार्यक्रमाचे संचालन सहकार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप अग्रवाल तर तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. जगदिश हेंडवे यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

जीवन घडविणारी कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना -अण्णासाहेब देशमुख पारवेकरबाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा...
02/03/2026

जीवन घडविणारी कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना -अण्णासाहेब देशमुख पारवेकर
बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे नुकतेच तरोडा पोड येथे उद्घाटन झाले. या उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्ष पारवा शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय अण्णासाहेब देशमुख पारवेकर तर उद्घाटक म्हणून डॉ. संजय गाढवे उपस्थित होते. पारवा शिक्षण संस्थेचे संचालक सचिन भाऊ पारवेकर, सुहास पारवेकर यांच्या सोबतच प्रा. मंगेश होटे, श्री.सुनील ठाकरे आणि श्री.मोरेश्वर सरोदे उपस्थित होते.

कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 यादरम्यान बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयच्या तरोडा पोड येथे श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात झाली. "युवकांच्या आयुष्याला वळण देणारी राष्ट्रीय सेवा योजना आहे .प्रत्येक विद्यार्थी हा सृजनशील असतो, निमित्त असावे लागते कोणत्यातरी प्रसंगाचे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला जातो. महाविद्यालयीन युवाशक्ती विधायक दिशेने वळविण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यास त्याला उद्युक्त करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रत्येक महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे.याचाच एक भाग म्हणून पारवा येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर शिबिराच्या उद्घाटकीय प्रसंगी लोकनेते अण्णासाहेब देशमुख पारवेकर म्हणाले, "विद्यार्थी हा भारताचा आधारस्तंभ आहे. या युवकांवर जर योग्य दिशेने संस्कार केले तर हाच युवक भारताला जागतिक स्तरावर नेऊ शकतो एवढी शक्ती त्यामध्ये आहे. युवकाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करते" हा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, समाजसेवा, संघटन कौशल्य, नेतृत्व गुण आणि विनयशीलता प्रतिबिंबित करते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक घडविण्यास हे शिबिर निश्चितच उपयुक्त ठरेल.
"राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी समाजातील सुखदु:खांना जवळून पाहतो. त्यामुळे त्याला आयुष्यात येणाऱ्या यश अपयशांना सहज समोर जाता येते. आपले जीवन अधिक सुखकर आणि बळकट बनविता येते. असा संदेश उद्घाटक डॉ. संजय गाढवे यांनी दिला."
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तरोडा येथील सरपंच श्रीमती योगिताताई कुळसंगे,उपसरपंच सोमेश्वर नगनूरवार, श्री राजेंद्र गोमासे, घाटंजी येथील गटशिक्षण अधिकारी प्रज्ञा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे विचारपिठावर विराजमान होते.

विद्यापीठ गीताने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमामध्ये तरोडा येथील गजानन रेड्डीवार, वसंतराव कोवे, प्रल्हादराव निकम, गणपतराव कन्नलवार, सुरेश पेटकुले, संदीप कडू, नारायण रेडीवार, रामदास राजूरकर, प्रकाश शेंडे, भीमरावजी आत्राम, सोनवणे तलाठी, देवरावजी सोयाम, गणेश राऊत, गजानन उत्तरवार, अनिल मडावी, ग्रामसेवक राजेश माहुरे, विशाल साबापुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बी.ए.भाग २ची विद्यार्थीनी कु. नंदिनी गुरुनुले,अनुजा प्रधान,दुर्गा शेंडे,अश्वीनी पेटकुले यांनी सुंदर स्वागत गीत गायले. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेण्यामागील भूमिका आणि पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे सरांनी व्यक्त केली. या निमित्ताने ते म्हणाले, "राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता बिंबविते.या माध्यमातून समाज उपयोगी आपण कार्य करू शकतो. समाजाची सेवा करण्याची संधी प्रत्येक महाविद्यालयात युवकाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळते. सेवेचे हे व्रत त्याने आयुष्यभर अंगिकारावे"असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन लोहवे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जगदीश हेंडवे आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संदीप देसाई, प्रा. डॉ. लक्ष्मण यादव, प्रा. डॉ. अभय चांदेकर, अजय पांचाळ, अरविंद जिड्डीवार, दिलीप इंगोले, राजू नगनुरवार, राहुल आडे, स्वामी गज्जलवार यांनी परिश्रम घेतले. शिबिरामध्ये बि.ए.भाग १,२,३ चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: पारवा : स्थानिक बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च मा...
28/01/2026

बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: पारवा : स्थानिक बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित ध्वजारोहण पारवा शिक्षण संस्थेचे संचालक सचिन देशमुख पारवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारवा शिक्षण संस्थेचे संचालक सुहास देशमुख पारवेकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय चौलमवर गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाच्या बी.ए. भाग दोन च्या विद्यार्थिनी कु. अश्विनी देवानंद पेटकुले, नंदिनी देविदास गुरनुले, व अनुजा जगदीश प्रधान यांनी सत्र 2025 - 26 मध्ये अमरावती विद्यापीठाचा तलवारबाजी या खेळात कलर कोट प्राप्त केल्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बा.दे. पारेकर महाविद्यालय संविधान दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न. स्थानिक बाबाचा देशमुख पारवेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा...
01/12/2025

बा.दे. पारेकर महाविद्यालय संविधान दिनानिमित्त भव्य रॅली संपन्न.
स्थानिक बाबाचा देशमुख पारवेकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत संविधान दिनानिमित्त संविधान रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी भारतीय संविधान व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रत हाती घेऊन घोषणा देत होते.महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातून रॅली रॅलीला सुरुवात करण्यात आली पुढे महाविद्यालयाच्या परिसरातून जाऊन रॅलीचा समारोप महाविद्यालयातील सभागृहामध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ. जगदीश हेंडवे , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. या संविधान रॅलीमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संचालन रक्षा आदेवार तर आभार शिवानी कापसे हिने मानले.

पारवेकर महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेकरिता निवड : पारवा : स्थानिक बाबासाहेब देशमुख ...
27/10/2025

पारवेकर महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेकरिता निवड : पारवा : स्थानिक बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. नुकत्याच श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी संपन्न झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेमध्ये कु. नंदिनी देविदास गुरनुले हिने फाईल या प्रकारात ब्राँझ मेडल, कु. अश्विनी देवानंद पेटकुले हिने ईपी या प्रकारात सिल्वर मेडल, तर अनुजा जगदीश प्रधान हिने सायबर या प्रकारात ब्राँझ मेडल पटकावित अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेकरिता उपरोक्त तिन्ही विद्यार्थिनींनी आपला प्रवेश निश्चित केला. दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती या ठिकाणी दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार असून तेथून पुढे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा तलवारबाजीचा संघ दिनांक 1 ते 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर, (पंजाब) या ठिकाणी संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. वाढोना सारख्या छोट्याशा गावातील विद्यार्थिनीची अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल परिसरात कौतुकाचे, आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धर्मेंद्र तेलगोटे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. अभय चांदेकर, तसेच आंतर विद्यापीठ तलवारबाजी खेळाडू कु. सुकन्या डोंगरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे पारवा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.अण्णासाहेब देशमुख पारवेकर, संचालक श्री.सुहास देशमुख पारवेकर, श्री. सचिन देशमुख पारवेकर, प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे तसेच महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात...

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आयोजित ‘युवा महोत्सव 2025’ हा राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव केशरबाई लाहोटी महाविद्यालय,...
13/10/2025

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आयोजित ‘युवा महोत्सव 2025’ हा राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पारवा येथील विद्यार्थिनींनी विविध कलाप्रकारात सहभाग नोंदवून, महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापक प्रा. डॉ. जगदीश हेंडवे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातर्फे सुगम संगीत, आदिवासी नृत्य आणि मूकनाट्य यांसारख्या कलाप्रकारात सादरीकरण केले. प्रा. डॉ. गजानन लोहवे (मराठी विभाग प्रमुख) लिखित व दिग्दर्शित ‘मोबाईलचा नाद’ हे मूकनाट्य विशेष लक्ष वेधून गेले. यामध्ये विद्यार्थिनींनी मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. तसेच आचल वाढई हिने ‘माझे माहेर पंढरी’ हे भक्तिगीत अत्यंत सुरेल स्वरात सादर करत रसिकांची मनं जिंकली. या महोत्सवात
आचल वाढई, अश्विनी पेटकुले, अनुजा प्रधान, नंदिनी गुरनुले, हर्षदा मोहूर्ले, अमिषा शेंडे, दुर्गा शेंडे, ऐश्वर्या गंधश्रीवार, रतीका प्रधान विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

Address

Near Forest Office
Yavatmal
445306

Alerts

Be the first to know and let us send you an email when BDP College,Parwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to BDP College,Parwa:

Share