Dhruv Sakore

Dhruv Sakore Director - Deepstambh Foundation
Founder - Glaubark Solutions

12/28/2025

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन.

मा. ना. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली लोकसेवेच्या माध्यमातून सेलूच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र वाटचाल करूया...

11/22/2025

आपलं मत, आपला आवाज !!!

11/02/2025

सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!!आपले आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शन हे आपल्या परिवाराच खरं बळ आहे...आपणास निरोगी उ...
10/24/2025

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा !!!

आपले आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शन हे आपल्या परिवाराच खरं बळ आहे...

आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !!!

10/23/2025

कर्तव्य, सेवा आणि कुटुंब — तिन्हींचा सुंदर समतोल साधणारी आमच्या घरची दिवाळी...

At the steps of Columbia University – where legends like Dr. B. R. Ambedkar once studied. Honored to begin my journey he...
09/13/2025

At the steps of Columbia University – where legends like Dr. B. R. Ambedkar once studied. Honored to begin my journey here, with Mom by my side...

मी फारसा बोलत नाही.आपल्या कुटुंबाबद्दल, त्यागाबद्दल, परंपरेबद्दल काहीच कधी उघडपणे मांडलं नाही.पण या १५ ऑगस्टला काहीतरी व...
08/15/2025

मी फारसा बोलत नाही.
आपल्या कुटुंबाबद्दल, त्यागाबद्दल, परंपरेबद्दल काहीच कधी उघडपणे मांडलं नाही.पण या १५ ऑगस्टला काहीतरी वेगळं वाटलं म्हणुन हा एक छोटा प्रयत्न.

पहिल्यांदाच वडिलांसोबत त्यांच्या कार्यालयात झेंडावंदन पाहिलं.त्या क्षणी, तिरंगा वर जाताना, माझ्या मनात एक विचार येऊन गेला :

आजोबा भारतीय नौदलात होते.
पाकिस्तानविरुद्ध तीन युद्धं लढली — कधी बोलून दाखवलं नाहीत त्यांनी, पण त्यांच्या डोळ्यात देशासाठी असलेली निःशब्द निष्ठा कायम दिसायची.

वडील — गेली ३० वर्षं भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी.शिस्त, संयम आणि जबाबदारी म्हणजे त्यांचं दुसरं नाव.त्यांच्यासोबत उभा राहताना मला वाटलं — ही केवळ एक घटना नव्हती,ही परंपरेची एक साखळी होती — जिचा मी एक दुवा आहे.

आईचे वडील, म्हणजे माझे आजोबा — २५ वर्षं आमदार होते.त्यांचं जनतेशी नातं हे राजकारणापलीकडचं होतं — लोकांचा विश्वास त्यांची खरी ताकद आहे.

आईबाबतीत नेहमी वाटतं — ती मंत्रिपद मिरवत नाही, ती लोकांशी नातं जपते.लोकांच्या प्रत्येक अडचणीत तिचा फोन सतत वाजतो,आणि तीही शांतपणे, कोणताही थाट न करता, "हो, बघते लगेच" म्हणते — तेही संध्याकाळ असो की मध्यरात्र.

त्या झेंड्याची दोरी ओढताना जी ऊर्जा जाणवली —ती केवळ ध्वजवंदनाची नव्हती, ती होती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सेवेच्या भावनेची आठवण.

ही पोस्ट कोणी पाहावी म्हणून नाही,
तर स्वतःला आठवण करून द्यावी म्हणून.
आपण कुठून आलोय, कोणत्या माणसांमध्ये वाढलोय,आणि आपण काय जपतोय — हे विसरू नये म्हणून.

आणि शेवटी,
ज्यांच्या मुळे आपला तिरंगा अभिमानाने फडकतो —त्या प्रत्येक सैनिक, पोलिस, शेतकरी, डॉक्टर, शिक्षक, शासकीय अधिकारी आणि सेवकाला मनापासून धन्यवाद आणि सलाम...

Address

116th And Broadway
New York, NY
10027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhruv Sakore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share