Jeevan Vikas Shikshan Sanstha

Jeevan Vikas Shikshan Sanstha Jeevan Vikas Shikshan Sanstha was set up in 1966 with a sole motto: 'To provide education to the ones who deserve it but cannot not afford it.' S T.

Jeevan Vikas Shikshan Sanstha was set up in 1966 with a sole motto: 'To provide education to the ones who deserve it but cannot not afford it.'

It was set up by Late Mr. Kadam & his associates. This institution consists of three schools: 1. Kadam Vidyalaya, Palghar 2. Anu Vikas Vidyalaya, Dandi 3. Shigaon Residential School. It also has a junior college in its Palghar Campus. The first school was

started in 1968, with only 4 students. Currently there are 4000 students studying in this institute. 90% students are from backward classes.

08/10/2025
14/04/2025

*Mumbai Cricket Association – U16 Boys Summer Camp*

We are pleased to announce the *Summer Camp for U16 Boys*, organized by the *Mumbai Cricket Association*, starting *15th April* at *Shri S. T. Kadam Vidyalaya Cricket Ground*.

*Selections will also begin from 15th April 2025*
Interested students are welcome to attend.

*Reporting Time:* 6:45 AM sharp

All aspiring cricketers are encouraged to arrive on time and come prepared.

For any details, please contact +919930218415

Inauguration ceremony of Dashing Super Woman T20 cup held at STK cricket ground on 09/04/2025, in the presence of Hon Pr...
09/04/2025

Inauguration ceremony of Dashing Super Woman T20 cup held at STK cricket ground on 09/04/2025, in the presence of Hon President of Mumbai cricket Association Mr. Ajinkya Naik, Hon secretary, Mr Abhay Hadap, Hon apex council member, Mrs Sangita Katware, Hon Chairman of Jeevan Vikas Shikshan Sanstha Mr Vagesh S. Kadam, Hon Treasurer of Jeevan Vikas Shikshan Sanstha Mr Pranav Kadam, Tournament Organiser Mr Vikas Patil and Mr Bhushan Patil and all other dignitaries of Mumbai cricket Association.

जीवन विकास शिक्षण संस्थेच्या एस.एस.सी. 1986 बॅचचा गेट-टुगेदर दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला.
14/02/2025

जीवन विकास शिक्षण संस्थेच्या एस.एस.सी. 1986 बॅचचा गेट-टुगेदर दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला.

श्री. स. तु.कदम विद्यालयाला मुंबई विभाग स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्तपालघर: "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर ...
15/10/2024

श्री. स. तु.कदम विद्यालयाला मुंबई विभाग स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त

पालघर: "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- २" योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माननीय श्री. दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या हस्ते जीवन विकास शिक्षण संस्थेचे श्री. स. तु. कदम माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयास खाजगी शाळा गट मुंबई विभाग द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते एन सी पी ए सेंटर मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कारांमध्ये सन्मानचिन्ह व रुपये पंधरा लाख शासकीय धनादेश देण्यात आला.
प्रसंगी पालघर शिक्षणाधिकारी सौ. संगीता भागवत, डाएट समन्वयक श्री. तानाजी डावरे, केंद्रप्रमुख महेश पिंपळे, जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. वागेश कदम, कोषाध्यक्ष मा. प्रणव कदम, सी.बी.एस.ई शाळेच्या व्यवस्थापिका मा. कोमल कदम, मुख्याध्यापिका सौ. संगीता गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा तारवी, पर्यवेक्षक तथा प्रकल्प प्रमुख गणेश प्रधान, जूनियर कॉलेज प्रभारी श्री. तुषार बाविस्कर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी पाटील, समन्वय समिती सदस्य श्री. प्रितम घरत, श्री. बापूराव थोरात, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

14/10/2024

*जीवन विकास शिक्षण संस्थेची श्री स. तु. कदम प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय पालघर*

💐आपली शाळा सुंदर शाळा💐

Send a message to learn more

🎊 🎊 *अभिनंदन*  🎊 🎊  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर ,शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद पालघर यांच्या सं...
05/10/2024

🎊 🎊 *अभिनंदन* 🎊 🎊

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर ,शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा शुक्रवार दिनांक 04. 10. 2024 रोजी डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज बोईसर येथे संपन्न झाली याप्रसंगी आपल्या श्री. स .तु. कदम विद्यालय माध्यमिक विभाग पालघर ची विद्यार्थिनी कु. श्रद्धा प्रशांत बसवत हिला गायन या कला प्रकारात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे, तरी संस्थेतर्फे, शाळेतर्फे तिचे खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

मतदार जनजागृती कार्यक्रम 2024जीवन विकास शिक्षण संस्थेच्या श्री.स.तु.कदम विद्यालयात गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 मतदार जन...
04/08/2024

मतदार जनजागृती कार्यक्रम 2024

जीवन विकास शिक्षण संस्थेच्या श्री.स.तु.कदम विद्यालयात गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 मतदार जनजागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री गोविंद बोडके सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.प्रसंगी जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.वागेश कदम साहेब, कोषाध्यक्ष मा.श्री. प्रणव कदम सर,उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना तथा स्वीप नोडल अधिकारी लोकसभा निवडणूक 2024 मा. श्रीमती विजया जाधव मॅडम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अपर्णा सोमानी मॅडम, मा. श्री रमेश शेंडगे साहेब, पालघर तहसीलदार, मा. श्री उमाकांत गायकवाड साहेब, मुख्याधिकारी पालघर नगरपरिषद तसेच विविध शासकीय अधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य ,पत्रकार, बोईसर व पालघर परिसरातील विविध शाळातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. भारताचा नकाशा मानवी साखळी रांगोळी द्वारे रेखाटण्यात आला होता कलात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांनी व कला शिक्षकांनी ही रचना केली होती.ही रचना करीत असताना विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. स.तु.कदम विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. सौ. संगीता गायकवाड मॅडम व कलाशिक्षक श्री. प्रितम घरत सर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मा.श्री गोविंद बोडके सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.स.तु. कदम विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ. सारिका वर्तक व सौ.अंकिता राय*यांनी केले.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" जिल्हास्तरीय पुरस्कारदिनांक 18 जुलै 2024 जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे सार्व...
01/08/2024

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" जिल्हास्तरीय पुरस्कार
दिनांक 18 जुलै 2024

जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, खासदार मा.डॉ. हेमंत सावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री प्रकाश निकम, कोकण पदवीधर आमदार मा.श्री. निरंजन डावखरे, कोकण शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मा.श्री.विनोद निकोले, आमदार मा.श्री.हितेंद्र ठाकूर, आमदार मा.श्री.राजेश पाटील, आमदार मा.श्री.दौलत दरोडा, आमदार मा.श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.श्री. पंकज कोरे , जिल्हाधिकारी मा.श्री. गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. भानुदास पालवे, शिक्षणाधिकारी श्रीम. संगीता भागवत इत्यादींची उपस्थिती होती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते श्री. स. तु. कदम विद्यालय पालघरचे जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्विकारताना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. वागेश कदम साहेब, कोषाध्यक्ष मा. श्री. प्रणव कदम, एस. टी. कदम इंग्रजी माध्यमाच्या व्यवस्थापिका मा. सौ. कोमल कदम, मा .मुख्याध्यापक, समन्वय समिती सदस्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी.

जीवन विकास शिक्षण संस्था, पालघर   ५८ व्या संस्था वर्धापनदिनानिमित्त संस्थेची प्रगती आणि दिशा  हितगुज सत्र  07 जुलै 2024 ...
30/07/2024

जीवन विकास शिक्षण संस्था, पालघर
५८ व्या संस्था वर्धापनदिनानिमित्त संस्थेची प्रगती आणि दिशा हितगुज सत्र

07 जुलै 2024

जीवन विकास शिक्षण संस्थेचा ५८ वा वर्धापन दिन श्री.स.तु.कदम CBSE विद्यालय पालघर येथे जीवन विकास शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री.वागेश कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.सदर कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह मा.श्री.रवींद्र कदम ,जीवन विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री.प्रणव कदम , CBSE STK च्या व्यवस्थापिका सौ. कोमल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्था वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम CBSE STK च्या शिक्षिकांनी राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली . श्री स. तु. कदम माध्यमिक विद्यालय, पालघर येथील शिक्षिकांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा. सौ. संगीता गायकवाड यांनी केले. आजच्या संस्था वर्धापनदिनानिमित्त अणु विकास विद्यालय, दांडीच्या सहशिक्षिका सौ. सुलोचना उमतोल यांनी आपली स्वरचित काव्य रचना सादर केली. जीवन विकास कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा सकाळ अधिवेशन प्रमुख मा. श्री. गणेश प्रधान यांनी संस्थेच्या सुरुवातीपासून ते रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंतची माहिती उपस्थितांना दिली. अणुविकास विद्यालय दांडीचे मुख्याध्यापक मा. श्री. अजय राऊत यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सव ते सुवर्ण महोत्सव वर्षांचा लेखाजोखा सादर केला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. शुभांगी पाटील यांनी सुवर्ण महोत्सवी वर्ष ते आजपर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री प्रणव कदम यांनी भविष्यात येणाऱ्या नवनवीन उद्दिष्टांची माहिती व कार्यवाहीची रूपरेषा स्पष्ट केली. आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मा.सौ. मनिषा तारवी यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला जीवन विकास शिक्षण संस्थेच्या सर्व आस्थापनातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , समन्वय समिती सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्कार 2022
30/07/2024

वसंत स्मृती आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्कार 2022

Address

Boisar Road, Opp Mission Compound
Boisar
401404

Telephone

+912525252172

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Vikas Shikshan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Jeevan Vikas Shikshan Sanstha:

Share