20/05/2017
बुधगाव येथील पद्मभूषण वसंतरावदा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला लोणेरे रायगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाची सलंग्नता २०१७ -२०१८ या शैक्षणीक वर्षापासून प्राप्त झालेली.आहे.
महाविद्यालयातील सर्व आठही शाखांना ही सलंग्नता प्राप्त झालेली असून २०१७ -१८ या वर्षी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यावर बी.टेक. ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाची पदवी प्राप्त होईल.
लोणेरे येथील विद्यापीठाशी सलंग्नता ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक अर्थाने फायद्याची ठरणार आहे.
1. सध्याच्या अभ्यासक्रमानुसार दर ६ महिन्यानी (मे –डिसेंबर) परीक्षा घेतली जाते;त्याऐवजी नवीन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार निकाल लागल्यानंतर १५ दिवसात फेरपरीक्षा घेतली जाईल,त्यामूळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणीक वर्ष वाचेल.
2. तसेच अंतीम वर्षात विद्यार्थ्यांना उद्योगाच्या मागणीनुसार वैकल्पिक विषय निवडण्याची मुभा देण्यात आलेली असून शेवटच्या सत्रात प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात अनुभव घेण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.
3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रकाल्पाधारीत शिक्षणावर भर असल्यामुळे वरील सर्व गोष्टींचा लाभ विद्यार्थ्यांना औद्योगीक व इतर क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्यासाठी जरूर होईल.