06/09/2024
शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेत गेल्या बरोबर शाळेतील अनेक विद्यार्थी शुभेच्छांसाठी पुढे आलेत. एका सातवीतील निरागस असणाऱ्या लहान मानवी प्रवीण चौधरी जी इयत्ता ७ वी मध्ये आहे. त्यांना अध्यापनाला नाही पण चट/proxy तास मिळाल्यास काही विषय हाताळत असतो. तिने व अंकिता व मंजिरी जोशी हिने मुखपृष्टावर Quilling कलेने तयार केलेले एक स्व-निर्मित भेट कार्ड दिले. मनाला फार भावूक केले. शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. सोबत दर वर्षी काही माजी विद्याथी आवर्जून भेटायला येतात, यावेळी देखील ते आलेत. अन सध्याच्या असलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह देखील आनंददायक होता. सर्वांनी अतिशय उत्साहाने तासिका घेऊन शिक्षक होण्यासाठी काय केले पाहिजे अन काय करावे लागते याचा अनुभव घेतला असेल. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल आपणा सर्वांचे मनस्वी आभार.