स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर - डोंबिवली

  • Home
  • India
  • Dombivli
  • स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर - डोंबिवली

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर - डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर - दत्तन?

10/05/2026

काही दिवसांपूर्वीच राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक डोंबिवली पूर्व शाळेतून आलेले प्रथम तीन क्रमांक

1. स्वरा निखिल वालावलकर 95.80%
2. लावण्या रमेश बेंद्रे 93.80%
3. मिताली देविदास राठोड 91.40%

सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐

अभिनंदन 🚩🥳8/12/2025 रोजी वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आयोजित कै दत्ताराम लाड लेझीम स्पर्धेत स्वामी विवेकानंद वि...
12/12/2025

अभिनंदन 🚩🥳
8/12/2025 रोजी वडाळा येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आयोजित कै दत्ताराम लाड लेझीम स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जाधव सरांचं हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

सी आर सी अंतर्गत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक म...
12/12/2025

सी आर सी अंतर्गत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. नभा पाटील आणि सोम्या पड्याळ या दोघी विद्यार्थिनींच हार्दिक अभिनंदन 💐💐💐

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर, डोंबिवली,माध्यमिक शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा व करिअर या...
10/08/2024

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर, डोंबिवली,माध्यमिक शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा व करिअर या विषयाचे व्याख्यान संपन्न झाले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा नेहमीच आग्रह राहिला आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक मध्ये करिअर मार्गदर्शन विषयी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच ध्रुव नॉलेज अकॅडमी चे अध्यक्ष व संचालक श्री .विनोद चंद्रकांत देशपांडे यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा बोंडे यांनी श्री. विनोद देशपांडे सरांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.
यूपीएससी सारखे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दहावीपासून कशाप्रकारे तयारी करावी. त्याचबरोबर ही स्पर्धा परीक्षा दिल्याने कोणत्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो याचे मार्गदर्शन श्री. देशपांडे सरांनी केले. याचबरोबर गुणवत्ता ही तर महत्त्वाचे आहेच परंतु मेहनत ही देखील तितकीच गरजेची आहे सांगण्यासाठी त्यांनी काहीविद्यार्थ्याचे उदाहरणे दिली.
यूपीएससी परीक्षेमधील अनेक प्रश्न हे शालेय अभ्यासक्रमातील पाचवी ते बारावीच्या अभ्यासावर आधारित असतात. त्यामुळे पाचवी ते बारावीचा सखोल अभ्यास केल्यास यूपीएससी परीक्षा देणे सोपे जाते असे त्यांनी म्हटले.
अभ्यासाबरोबर चिकाटी देखील आवश्यक आहे व सातत्य असावे. यूपीएससी ची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांनी आत्ता रोजचे वृत्तपत्र वाचन विविध माध्यमातून बातम्यांचे आकलन करून घेणे राष्ट्रीय घडामोडी यांची माहिती ठेवावी असेदेखील सांगितले.
सरांनी बाबा आमटे यांचे उदाहरण देताना त्यांनी स्वतःच्या भीतीवर कशाप्रकारे मात केली हे सांगितले.
यावेळी विद्यार्थी व पालकांनी आपल्या यूपीएससी व एमपीएससी परीक्षेसंदर्भात शंका विचारल्या. त्यांचे निरसन श्री. देशपांडे सरांनी केले
यासाठी मुख्याध्यापिका सौ.बोंडे मॅडम व पर्यवेक्षिका सौ. दौंड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
व्याख्यानाला इयत्ता दहावी व नववीचे विद्यार्थी , तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
व्याख्यानाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. सावंत यांनी केले पाहुण्यांचा परिचय श्री.संदीप भावे यांनी करून दिला. तर तयारी सौ. छाया भालेराव व श्रीमती आशा वळवी मॅडम यांनी केली.

दिनांक 3 ऑगस्ट 2024 शनिवार राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक, डोंबिवली येथे ...
03/08/2024

दिनांक 3 ऑगस्ट 2024 शनिवार राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक, डोंबिवली येथे रांगोळीच्या माध्यमातून दिव्यांची सुंदर आरास मांडून दीप अमावस्या साजरी केली गेली . तमासो मा ज्योतिर्गमय !दिवा हा मांगल्याचा ,समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दीप पूजन हा एक मार्ग आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुलभा बोंडे ,पर्यवेक्षिका मा.सौ जयश्री दौंड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते दीपपूजन केले गेले .विद्यार्थ्यांनी श्री सूक्त ,गणपती स्तोत्र व शुभंकरोती स्तोत्र म्हणून दीप पूजन केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गासमोर देखील दीप पूजन करून रांगोळी काढली होती .
सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान ,आरोग्य, ऐश्वर्य,शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होऊ दे हीच प्रार्थना स्वामी विवेकानंद दत्तनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी दीप अमावस्येच्या प्रसंगी केली. तसेच ऑलिंपिक मध्ये भारताला भरघोस यश , पदकेमिळावे अशी प्रार्थना देखील विद्यार्थ्यांनी केली

नमस्कार.राष्ट्रीय शिक्षण संस्था , रेझिंग ए मॅथेमॅटिशियन फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांच्या संयुक्त विद्याम...
29/07/2024

नमस्कार.
राष्ट्रीय शिक्षण संस्था , रेझिंग ए मॅथेमॅटिशियन फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांच्या संयुक्त विद्यामाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित विषयासंबंधित 'मॅथ्स सर्कल' या उपक्रमाचा तिसऱ्या वर्षाचा शुभारंभ नुकताच राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहामध्ये संपन्न झाला.
यावेळी संस्था अध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी व मॅथ्स सर्कल उपक्रमाच्या संयोजिका व संस्था सदस्या डॉ.सौ. सरोज कुलकर्णी, रेझिंग ए मॅथेमॅटिशियनचे सहसंस्थापक श्री. विनय नायर , संस्था सदस्य श्री. प्रकाश म्हात्रे , श्रीप्रसाद तांबे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्था अध्यक्ष श्री.संजय कुलकर्णी यांनी शालेय विद्यार्थ्यांचा गणिती अभ्यास करताना बुद्धीचा कस वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्याची कल्पना सुचली असे म्हटले. गेली दोन वर्ष हा उपक्रम चालू असून यंदाचे हे तिसरे वर्ष आहे असे सांगितले. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांचे सहकार्य व रेझिंग मॅथेमॅटिशन ची टीम यांच्यामुळेच हे शक्य झाले. गणितातील अमूर्त संकल्पना स्वतः कशाप्रकारे सोडवून गणित ऑलिंपियाड पर्यंत मजल मारून पुढे गणितज्ञ होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. सौ. सरोज कुलकर्णी यांनी म्हटले की गेली दोन वर्षे मॅथ्स सर्कल या उपक्रमामुळे यंदा त्यामधून बारा विद्यार्थ्यांचे गणित ऑलिंपियाडसाठी सिलेक्शन झाले आहे. हेच या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल.
रोटरी क्लबचे माजी प्रेसिडेंट श्री.संतोष नंबोद्री यांनी गणित हे अतिशय महत्त्वाचे असून गणितातील उदाहरणे सोडवून त्यातून शास्त्रज्ञ घडवण्याची रोटरी क्लब ची इच्छा असल्याचे म्हणाले.
रेझिंग अ मॅथेमॅटिशन या संस्थेविषयी माहिती देताना संस्थेचे सहसंस्थापक श्री.विनय नायर यांनी अकरा वर्षापूर्वी या संस्थेची डोंबिवलीत स्थापना केली असून 15000 पेक्षा अधिक विद्यार्थी यामधून पुढे गेले आहेत. गणित शिकण्यासाठी संयम बाळगावा लागतो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवीन प्रश्न कसे सोडवायचे याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार आहे.
यानंतर श्री.केदार पेणकर यांनी मुलांमध्ये या उपक्रमामुळे सभाधिपणा निर्माण होतो व शाळेबाहेरील विद्यार्थ्यांबरोबर गणिते सोडवण्याचा आनंद घेत हे विद्यार्थी गणित शिकतात असे म्हटले.
रोटरी क्लब सनसिटीचे अध्यक्ष के. राधाकृष्णन् यांच्या पत्नी सौ. अनुजा राधाकृष्णन् , प्रकल्प समन्वयक श्री. संतोष नंबूद्री , रेझिंग ए मॅथेमॅटिशियनचे सहसंस्थापक विनय नायर , सौ .नायर ,श्रीपाद तांबे,केदार पेणकर,कौस्तुभ लिमये,सौ. अनुज्ञा राधाकृष्णन,द्रुपद तांबे, निकिता गोयल , सुंदरम शर्मा , धन्वी दोषी,नेहा बारवकर हे उपस्थित होते. हा उपक्रम दर शनिवारी संध्याकाळी ४:३० वाजता डॉ.हेडगेवार सभागृहामध्ये होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. केतकी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सदस्या व मॅथ्स सर्कल संयोजिका डॉ.सौ सरोज कुलकर्णी यांनी केले व नियोजन मुख्याध्यापिका सौ. वैभवी सावंत यांनी केले.स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाखेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाला सर्व शाळांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक,पालक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेत क्रीडादिन साजरा केला. त्यातली काही क्षणचित्रे.
26/07/2024

शाळेत क्रीडादिन साजरा केला. त्यातली काही क्षणचित्रे.

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलातील नो...
18/07/2024

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलातील नोकरीच्या संधी यावर विशेष व्याख्यान संपन्न.

निवृत्त मेजर श्री विनय देगावकर यांचे सैन्य दलातील विविध पदे व भरती प्रक्रिया या विषयावर व्याख्यान आज शाळेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहामध्ये संपन्न झाले.इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय सैन्य दलाचे विविध विभागाचे कामकाज कसे चालते, यासाठी आपण कशा पद्धतीने शारीरिक व मानसिकरित्या तयार व्हावे याचे मार्गदर्शन श्री देगावकर यांनी करतानाच लष्करामध्ये सैनिक व अधिकारी या दोन्ही पदासाठीची निवड कशी होते त्यासाठी किती शिक्षण लागते ते सांगितले.
अगदी ब्रिटिश काळात सुरू झालेलं भारतीय लष्कर ते आत्ताचे सैन्य दल इथपर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितला. भारताचे सर्वात जास्त सैनिक हे उत्तर भागातील सीमेवर आहे. भारताने पाकिस्तान, चीन यांच्याबरोबर झालेल्या युद्धात कशाप्रकारे जिंकलो ते सांगितले.
सैन्य दलातून परमवीर चक्र , अशोक चक्र अशी मानाची शौर्यपदके मिळवलेल्या सैनिकांची माहिती त्यांनी दिली.
त्याचबरोबर सैन्य दलात अभियंता म्हणून कार्य करताना आलेल्या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.
तर अजूनही पालक आपल्या मुलांना सैनिक म्हणून पाठवण्यास धजावत नाहीत ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन त्यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलभा बोंडे , ज्येष्ठ शिक्षक श्री. लजपत जाधव हे उपस्थित होते . तर सूत्रसंचालन सौ.छाया भालेराव यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था सौ. मधुरा सावंत व श्री. संदीप भावे यांनी पहिली. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेची "आषाढी दिंडी "राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर ...
17/07/2024

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेची "आषाढी दिंडी "

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी औचित्य साधून दिंडीचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सकाळी नऊ वाजता विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत पंडित दीनदयाळ सभागृहात. जमा झाले. माननीय मुख्याध्यापिका सौ. सुलभा बोंडे मॅडम व माननीय पर्यवेक्षिका सौ. जयश्री दौंड मॅडम यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन केले. विठ्ठल रखुमाई च्या वेशामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण केले.
हरिनामाचा जयघोष करत दिंडी शाळेजवळील विठ्ठल मंदिरात पोहोचली. विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची मनोभावे पूजा मा मुख्याध्यापिका सौ बोंडे बाई यांनी केली. तसेच माजी विद्यार्थी व पत्रकार श्री. अभिजीत पवार यांनी पूजा करून विद्यार्थ्यांसोबत विठू नामाचा गजर करत ढोल ताशांच्या तालावर फेर धरला. विद्यार्थिनींनी पारंपारिक फुगड्यांचे विविध प्रकार सादर केले. शिक्षक व पालक यांनीही फुगड्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
टाळ आणि तबल्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्ती गीते म्हटली.शिक्षकांनी ही अभंग गायले. ' ज्ञानोबा माऊली तुकाराम' म्हणत दिंडीने पुन्हा शाळेकडे प्रस्थान केले. अशाप्रकारे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेत आषाढी एकादशीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला

21/06/2024

आंतरराष्ट्रीय योग दिवस

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेत योग दिन साजरा करण्यात आला.  शाळेतील ...
21/06/2024

राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर माध्यमिक शाळेत योग दिन साजरा करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक केले. त्याचबरोबर संगीताच्या तालावर विविध योगासाने सादर केली.यामध्ये दंडासन , वज्रासन, सर्वांगासन, पादासन, भुजंगासन ,अर्धचक्रासन, ताडासन अशा प्रकारची योगासने करून उपस्थितांना थक्क केले.
यावेळी शाळा समिती सदस्या ,सौ माधवी कुलकर्णी, सौ. दीपा आपटे,गोपाळ नगर शाळेचे माजी विद्यार्थी व पत्रकार अभिजीत पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा बोंडे ,पर्यवेक्षिका सौ. जयश्री दौंड व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रथम शाळेतील विद्यार्थिनींनी 'शुभं करोति कल्याणम' ही प्रार्थना अतिशय सुरेख आवाजात सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बोंडे मॅडम यांनी अष्टांग योगासने याविषयी माहिती सांगितली. यामुळे शरीर व मन बळकट बनते. बुद्धी तल्लख होते तर इंद्रियां वर नियंत्रण ठेवता येते असे म्हटले.
शाळा समिती सदस्य सौ. दीपा आपटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगासने दररोज घालावेत यासाठी माहिती सांगितली तसेच सौ. माधवी कुलकर्णी मॅडम यांनी स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी यांचे शरीर व मन कसे बळकट होते त्याप्रमाणे आपणही शरीर व मन बळकटीसाठी प्रयत्न करावेत व दररोज सूर्यनमस्कार घालावे असे सांगितले.
श्री.अभिजीत पवार यांनी योगासने करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी पाटोळे हिने तर आभार लावण्या बेंद्रे हिने मानले.

Address

Ayre Road
Dombivli
421201

Opening Hours

11am - 6pm

Telephone

+919702311891

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर - डोंबिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर - डोंबिवली:

Share