16/09/2021
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक दिन साजरा......
औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव या महाविद्यालयामध्ये आज शिक्षक दिन निम्मित कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी कार्यक्रमासाठी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षा सौ.जयदेवी बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोष्याध्यक्ष श्री शिवलिंगजी जेवळे तसेच हासेगाव येथील उपसरपंच श्री सलीम शेख यांची प्रमुख उपस्तिथी होती या कार्यक्रमामध्ये श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत चालणाऱ्या सर्वच विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ई. उपस्तीथ होते दरवर्षीप्रमाणे या वर्षीही २०२१ आदर्श शिक्षक व आदर्श शिक्ष्क्केतर कर्मचारी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असता राजीव गांधी इन्स्टिटयूट ऑफ पॉलीटेक्निक मधील प्रा.श्री.सतीश गायकवाड सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार,शाल,श्रीफळ , सन्मान चिन्ह व ३००० रू रोख देऊन तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव मधील श्री.ऋषिकेश काळे यांना आदर्श शिक्षकेत्तर पुरस्कार शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह व २००० रू रोख देऊन तसेच संस्थेमधील सेवक कर्मचारी श्री.संतोष माने व श्री.कैलास कोळपे यांचा आदर्श सेवक कर्मचारी हा पुरस्कार शाल, श्रीफळ ,सन्मानचिन्ह व १००० रू रोख देऊन सर्वांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे याच्या हस्ते करण्यात आला दरवर्षी संस्थेमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने आपले काम करणाऱ्या कर्मचारी यांचे कौतुक करण्यासाठी हे पुरस्कार जाहीर केले जातात कार्यक्रमानंतर संस्थेचे कोष्याध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे व सचिव श्री वेताळेश्वर बावगे यांनी संस्थेतील कर्मचारी यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.