Mph mahila college malegaon

Mph mahila college malegaon Mahilaratna Pushpatai Hiray Arts, Science and Commerce Mahila Mahavidyalaya, Malegaon Camp, Dist.Nashik

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पु...
02/03/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासह संयुक्त विद्यमाने दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘ऐतिहासिक स्थळ दत्तक योजना’ अंतर्गत एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा प्राचार्य डॉ. रजनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराजा सयाजीराव गायकवाड राजवाडा, कौळाणे येथे संपन्न झाली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मसगा महाविद्यालय, मालेगाव येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. जितेंद्र पगार यांनी ‘ऐतिहासिक स्थळ संवर्धन जाणीव व जागृती’ या विषयावर मार्गदर्शन केले. “इतिहास पुराव्यांवर जगतो. गड-किल्ले व ऐतिहासिक स्थळे भावी पिढ्यांना सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक व राजकीय शिकवण देतात. या ठेव्याचे जतन प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
दुसऱ्या सत्रात प्रा. महादेव क्षीरसागर यांनी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड कौळाणे राजवाडा : ऐतिहासिक वास्तू’ या विषयावर बडोदा संस्थानाच्या राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाबाबत सविस्तर माहिती दिली. कौळाणे राजवाडा हे स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण असून, युनेस्को जागतिक वारसा स्थानोंमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे. पर्यटन, अर्थव्यवस्था व रोजगाराच्या दृष्टिकोनातून संवर्धन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रा.से.यो. स्वयंसेवकांनी राजवाडा परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता व सुशोभीकरण केले. या उपक्रमास राजवाडा व्यवस्थासमितीचे श्री. चक्रपाणी संतोष पुरी गोसावी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी सोनटक्के, प्रास्ताविक डॉ. शिल्पा यन्नावार, आभार प्रा. दिव्या पाटील यांनी मानले. प्रा.अनुज बोंगाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
#ऐतिहासिक_स्थळ_दत्तक_योजना

मालेगाव - येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात सावि...
02/03/2026

मालेगाव - येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी एकदिवसीय *आर्थिक साक्षरता- सद्यस्थितीची गरज* या विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेसाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. डॉ संपदा हिरे यांची प्रेरणा मिळाली.

एकदिवसीय कार्यशाळा *आर्थिक साक्षरता- सद्यस्थितीची गरज* यासाठी प्रमुख व्याख्याते चांदवड येथील एस एन जे बी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभागाचे डॉ. देवेंद्र दगडे यांनी 'संपत्ती निर्मिती करताना बचत, गुंतवणूक व कर' यातील समतोल साधत आर्थिक निर्भर बनण्याचे विविध तंत्र सहज सोप्या व बोलक्या भाषाशैलीत संवाद साधत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये मालेगाव शहरातील प्रसिद्ध आर्थिक सल्लागार व गुंतवणूकदार डॉ व्यंकटेश मारू यांनी 'बचत व खर्च याचा समतोल साधत केलेली गुंतवणूक' या विषयावरील सोप्या भाषेत अभ्यासपूर्ण विवेचन केले. याबरोबरच आर्थिक साक्षरतामध्ये बँकिंग, विमा, गुंतवणूक इत्यादी बाबत निर्माण झालेल्या विविध रोजगार विषयक क्षेत्रांची माहिती विद्यार्थिनींना दिली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रजनी पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये, 'आर्थिक साक्षरता हा केवळ वाणिज्य शाखेचा विषय नसून व्यक्तीशः प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा महत्त्वपूर्ण विषय आहे. बाजारपेठेतील जोखीम लक्षात घेऊन डोळसपणे केलेली गुंतवणूक आर्थिक दृष्ट्या व्यक्तीला सक्षम करतो असे उद्बोधित केले.
कार्यशाळेसाठी जळगावचोंडी, जे टी महाविद्यालय, सिटी महाविद्यालय, काबरा महाविद्यालय, मसगा महाविद्यालय, रावळगाव महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक वर्गांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकदिवसीय कार्यशाळेसाठी एकूण १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉ रजनी पाटील, उपप्राचार्य डॉ दिपांजली बोरसे व शैक्षणिक पर्यवेक्षिका डॉ मीना पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री गोविंद मगरे व कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील प्रा दिपाली चंद्रमोरे यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख डॉ वैजयंती रामावत यांनी केले.
#आर्थिक_साक्षरता

02/03/2026
मालेगाव कॅम्प : विद्यार्थी विकास मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व संगीत विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचल...
20/01/2026

मालेगाव कॅम्प : विद्यार्थी विकास मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व संगीत विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय,मालेगाव कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "महिलारत्न पुष्पाताई हिरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा: वर्ष ७ वे चा पारितोषिक वितरण समारंभ दि. १७ जानेवारी २०२६ रोजी, ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायक मा. श्री. ओम बोंगाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी अतिथीय मनोगत व्यक्त करताना स्पर्धकांना संबोधून श्री.ओम बोंगाणे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी भक्कम अशी प्रेरणा देत असतात. स्पर्धांमुळे अनुषंगिक तयारीचे महत्व वाढीस लागते. संगीत क्षेत्रात गायक म्हणून भविष्यात उत्तम कामगिरी करायची असेल तर गाण्याप्रति व शिकण्याप्रति विनम्रभाव व चिकाटी अत्यावश्यक आहे.डोळस व प्रखर साधनेमुळेच गायकाचे गाणे दैदिप्यमान होते असेही ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांचे संगीत गुरु उस्ताद राशीद खान यांनी गायलेले "आओगे जब तुम ओ साजना अंगना फूल खिलेंगे" हे गाणे सादर करून उपस्थितांना भावसुरांनी मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयक,या महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्ष तसेच या स्पर्धेच्या संकल्पक व मार्गदर्शक डॉ. संपदा प्रशांत हिरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, शास्त्रीय,उपशास्त्रीय,सुगम व समूह गायन या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धांच्या माध्यमातून शास्त्रीय, उपशास्त्रीय व एकूणच संगीताच्या विविध प्रकारांचा प्रचार व प्रसार व्हावा, सांगीतिक शिक्षणाकडे विद्यार्थी अधिकाधिक आकर्षित व्हावेत,मालेगावसारख्या सांगीतिक उदयोन्मुख शहरामध्ये सांगीतिक विचारांची आदान-प्रदान होऊन सुरांचा जागर व्हावा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगीतिक गुण प्रदर्शित करण्यासाठी भक्कम मंच उपलब्ध व्हावा या उदात्त हेतुने २०१९ - २० या शैक्षणिक वर्षापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दरवर्षीच मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मंचीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले व या स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
#महिलारत्न_पुष्पाताई_हिरे #राज्यस्तरीय_गायन_स्पर्धा
#आंतरमहाविद्यालयीन_गायन

SVEEP उपक्रमांतर्गत मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदान जनजागृती अभियानानिमित्त "सक्षम लोकशाहीसाठी...
20/01/2026

SVEEP उपक्रमांतर्गत मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदान जनजागृती अभियानानिमित्त "सक्षम लोकशाहीसाठी मतदानात युवकांचा सहभाग" या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील कु. वैष्णवी काळे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
महानगरपालिकेचे आयुक्त मा. रवींद्र जाधव सरांच्या हस्ते वैष्णवीला सन्मानचिन्ह, १००० रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत प्रथम वर्ष कला शाखेतील कु. विद्या निकम, कु. वैशाली निकम व द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील कु. खुशाली निकम या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या यशाबद्दल महाविद्यालयीन परिवारातर्फे विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.सदर स्पर्धेसाठी वादविवाद समिती प्रमुख डॉ. प्रेमल देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
#मतदान_जनजागृती #मतदानाचा_हक्क #लोकशाही

मालेगाव कॅम्प : येथील, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्या...
20/01/2026

मालेगाव कॅम्प : येथील, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागाद्वारे,दि.१७ जानेवारी २०२६ रोजी, एकदिवसीय "महिलारत्न पुष्पाताई हिरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे" सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प येथे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत इत्यादी संगीत प्रकारांचे जतन-संवर्धन व्हावे व या स्पर्धेच्या माध्यमातून संगीत शिक्षणाची व संगीताच्या प्रचार-प्रसाराची चळवळ अधिक जोमाने गतिमान व्हावी या उदात्त हेतुने ह्या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.

या स्पर्धेत वैयक्तिक उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायन, वैयक्तिक उपशास्त्रीय संगीत गायन, वैयक्तिक भारतीय सुगम संगीत गायन, वैयक्तिक पाश्चात्य सुगम संगीत गायन, भारतीय समूहगीत गायन व पाश्चात्य समूहगीत गायन अशा सहा स्पर्धा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्पर्धा प्रकारांमध्ये ७००१,५००१ व २१०१ रुपये रोख याप्रमाणे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील तसेच सदर स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या स्पर्धकसंघाला फिरता चषक प्रदान केला जाईल.

सदर स्पर्धेतील पारितोषिके संगीत क्षेत्रातील ख्यातनाम दिग्गजांच्या हस्ते वितरीत करण्याची परंपरा आहे.या स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून अल्पावधीतच महाराष्ट्रातील महाविद्यालयीन संगीतप्रेमी स्पर्धक विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा अत्यंत प्रिय व प्रतिष्ठेची ठरलेली आहे.

याहीवर्षी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील संगीतप्रेमी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सदर स्पर्धेत सहभाग घ्यावा व स्पर्धेनुषंगाने अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी पाटील, उपप्राचार्य डॉ. दीपांजली बोरसे, संगीत विभागप्रमुख प्रा. अशोक एस. जाधव (मो.९३७१९२०६६६) , डॉ. संतोष द. परचुरे(मो.९२७२७२७९९९) ,प्रा.अनुज बोंगाणे (८२०८८१२०७९) व प्रा.नेहा चव्हाण (९५२९३४३७२८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयक तथा महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्ष डॉ. संपदा प्रशांत हिरे यांनी सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
#महिलारत्न_पुष्पाताई_हिरे #राज्यस्तरीय_गायन_स्पर्धा

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा य...
20/01/2026

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप यशस्वीपणे पार पडला. हे शिबिर खाकुर्डी ग्रामपंचायतीत २९ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न झाले.
समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. व्ही. एस. मोरे (मामासाहेब, सहसचिव, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था), प्रा. सुभाष निकम (विश्वस्त, महात्मा गांधी विद्यामंदिर व प्राचार्य, एम. एस. जी. स्वायत्त महाविद्यालय, मालेगाव), मा. पवनदादा ठाकरे, मा. प्रतिक ठाकरे आणि श्री. एस. डी. वाघ (मुख्याध्यापक, सेवा इंग्लिश स्कूल) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी पाटील होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली. प्रमुख अतिथी प्रा. डॉ. व्ही. एस. मोरे यांनी मनोगतात रासेयो उपक्रमाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थिनींना राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणा दिली. प्रा. सुभाष निकम यांनी स्वयंसेविकांचे अभिनंदन करत रासेयोला समाजाशी जोडणारी आणि श्रमसंस्कार घडविणारी unqiue योजना म्हटले. अध्यक्षीय भाषणात डॉ. रजनी पाटील यांनी श्रमदान, ग्रामस्वच्छता आणि जनजागृती उपक्रमांद्वारे तरुण पिढीला श्रमाचे मूल्य शिकविणाऱ्या रासेयोची प्रशंसा केली.
स्वयंसेविकांनी ईशस्तवन, स्वागतगीत, पथनाट्य आणि समूहनृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रास्ताविक व शिबिर आढावा कार्यक्रम अधिकारी डॉ. शिल्पा यन्नावार यांनी सादर केला. सूत्रसंचालन कु. देवयानी सूर्यवंशी आणि कु. नेहा पोतदार यांनी तर आभार सहकार्यक्रम अधिकारी डॉ. तेजस्विनी सोनटक्के यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एन. ए. पाटील, प्रा. दिव्या पाटील, प्रा. अनुज बोंगाणे आणि श्रीमती कविता पाटील यांचे अथक परिश्रम कौतुकास्पद ठरले. महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
#रासेयो #रासेयो_विशेष_शिबिर
#सात_दिवसीय_शिबिर #श्रमसंस्कार

महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या वतीने ‘वुमन्स...
20/01/2026

महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या वतीने ‘वुमन्स हेल्थ अँड हायजिन अवेअरनेस प्रोग्राम’ या महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले. महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती व ब्रँड टच अँड अनालिटिक्सच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम साजरा झाला.या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता तसेच मासिक पाळीशी संबंधित गैरसमज व त्यावरील योग्य उपायांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. रजनी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही आत्मसन्मानाची बाब असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनी सक्षम होतात, असे सांगितले , तसेच ब्रँड टच अँड अनालिटिक्सचे चेतन जगताप यांनी महिलांच्या आरोग्य जागृती ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. राजश्री सावंत (समन्वयक, महिला कल्याण व तक्रार निवारण समिती) यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकत विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात ब्रँड टच अँड अनालिटिक्सच्या वतीने ३०० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन गिफ्ट हॅम्पर वाटप करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. दीपांजली बोरसे व शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. मीना पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. अनिता नेरे, प्रा. मंगला सोनवणे, प्रा. डॉ. योगिता घुमरे, प्रा. तेजल पानसरे व प्रा. ऋतुजा भामरे यांनी यशस्वीरीत्या केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
#महिला_आरोग्य #महिला_आरोग्य_जनजागृती #वुमन्स_हेल्थ

महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात १९ डिसेंबर २०२५ रोजी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाल...
21/12/2025

महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात १९ डिसेंबर २०२५ रोजी पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी या कार्यक्रमाला भरभरून हजेरी लावली.प्राचार्य डॉ. रजनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात त्या म्हणाल्या, विद्यार्थी, शिक्षक व पालक हे शिक्षणाचे त्रिकोण असून त्यांचा समन्वय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सहशैक्षणिक क्रियाकलापांत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.प्राध्यापकांनी विविध समित्या व उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. प्रा. नवनिता देसले यांनी नवीन शैक्षणिक धोरण, स्किल एनहांसमेंट कोर्स व ओपन इलेक्टिव्हबाबत माहिती दिली. डॉ. सावंत यांनी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य, डॉ. आव्हाड यांनी शासकीय शिष्यवृत्ती, डॉ. शिल्पा येन्नावर यांनी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. दिपाली चंद्रमोरे यांनी परीक्षा विभाग, डॉ. प्रज्ञा सुरवसे यांनी विद्यार्थी विकास मंडळ व प्रा. वाघ यांनी वार्षिक शैक्षणिक सहलीबाबत सविस्तर माहिती दिली.पालकांनी मोबाईलचा अतिवापर व टीव्ही मालिकांमुळे होणारा वेळेचा अपव्यय याबाबत चिंता व्यक्त केली. महाविद्यालयाच्या सूचना पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. उपप्राचार्य डॉ. दीपांजली बोरसे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. वैजयंती रामावत उपस्थित होत्या. डॉ. शुभदा जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. स्नेहल मराठे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

#पालकमेळावा2025
#महिलारत्नपुष्पाताईहिरेमहाविद्यालय
#महिला_महाविद्यालय #शिक्षणाचा_त्रिकोण
#विद्यार्थी_शिक्षक_पालक #सर्वांगीण_विकास

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा य...
19/08/2025

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महिलारत्न पुष्पाताई हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी 'विभाजन विभीषिका स्मृती दिन ' महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थिनींना विभाजन विभीषिका स्मृतिदिनानिमित्ताने नाटिका दाखविण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी 'विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्ताने विविध घोषवाक्यांचे पोस्टर्स दाखविण्यात आले. त्यानंतर महिला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. जयेश भावसार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये, 'विद्यार्थिनींना फाळणीचा इतिहास, फाळणी पाठीमागील कारणे, तत्कालीन परिस्थिती त्यामुळे देशामध्ये निर्माण झालेली अंतर्गत विदारक परिस्थिती, घटना, विस्थापितांच्या अडचणी याप्रसंगी प्रतिपादित केल्या.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी पाटील तसेच उपप्राचार्य डॉ. दिपांजली बोरसे, शैक्षणिक पर्यवेक्षिका डॉ. मीना पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिल्पा यन्नावार, सुत्रसंचालन डॉ. तेजस्विनी सोनटक्के, तंत्रज्ञानात्मक साह्य प्रा. दिव्या पाटील, आभार प्रदर्शन प्रा. अनुज बोंगाणे यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.
#विभाजनविभीषिकास्मृतिदिन #राष्ट्रीयसेवायोजना

Address

Malegaon
423203

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mph mahila college malegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share