26/05/2022
सपकाळ नॉलेज हब 'करियर कट्टा' अंतर्गत करियर संधी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
एक छोटासा विचार आपले आयुष्य बदलू शकतो : PSI- रुपाली केदार
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 'करिअर कट्टा'या उपक्रमा अंतर्गत सपकाळ नॉलेज हबच्या सभागृहामध्ये तांत्रिक आणि सार्वजनिक विभागामध्ये असणा-या 'करियर सुसंधी आणि स्पर्धा परीक्षा तयारी' या विषयीच्या मार्गदर्शन शिबिराचे लेट.जी.एन.सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजन करण्यात होते.
कीर्तनकार ते पोलिस उप निरीक्षक असा संघर्षमय प्रवास केलेल्या शेतकरी कन्या आणि सपकाळ अभियांत्रिकी महाविद्याल्याच्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी शाखेची माजी विद्यार्थिनी राहिलेल्या पोलीस उप निरीक्षक रुपाली केदार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.