Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik - YCMOU

  • Home
  • India
  • Nashik
  • Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik - YCMOU

Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik - YCMOU Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik - YCMOU, College & University, YCMOU, Dnyangangotri, Govardhan, Near Gangapur Dam, Nashik.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.               जनसपंर्क अधिकारी,यशवंतर...
17/03/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.

जनसपंर्क अधिकारी,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
[email protected]

सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने रोजगार मेळा...
17/03/2026

सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीने रोजगार मेळावा आयोजन केले .
या मेळाव्यासाठी चे माहिती पत्रक व सहभाग नोंदणीसाठी गुगल लिंक सोबत पाठवीत आहोत गुगल लिंक मार्फत फॉर्म भरून नोंदणी करणे अनिवार्य आहे
आपण अभ्यास केंद्रातील आजी व माजी विद्यार्थी तसेच आपल्या महाविद्यालयातील नियमित विद्यार्थी व परिसरातील पात्र उमेदवारांना हे अवगत करून या रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती माहिती पत्रकात रोजगार मेळाव्याचे ठिकाण पत्ता व संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले आहेतhttps://docs.google.com/forms/d/14L5dUmyYoxMtBi1GsQvxlz006ceWOhOoApI2z-DNWcs/viewform?edit_requested=true

YCMOU पुणे विभागीय केंद्र आणि युवाशक्ती फौंडेशनच्या वतीने दिनांक 23 मार्च 2026 रोजी आयोजित रोजगार मेळाव्याकरीता नोंदणीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा किंवा पुढील लिंकद्वारे सुद्धा, इच्छुक युवक युवतींना नोंदणी करता येईल.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.              जनसपंर्क अधिकारी,यशवंतरा...
17/03/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.

जनसपंर्क अधिकारी,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
[email protected]

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.जनसपंर्क अधिकारी,यशवंतराव चव्हाण महारा...
05/03/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.

जनसपंर्क अधिकारी,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
[email protected]

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.              जनसपंर्क अधिकारी,यशवंतराव चव्ह...
03/03/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.

जनसपंर्क अधिकारी,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
[email protected]

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.                  जनसपंर्क अधिकारी,यशव...
03/02/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.

जनसपंर्क अधिकारी,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

02/02/2026
02/02/2026

सात दिवसीय मोफत निवासी मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचे आयोजन
नाशिक (प्रतिनधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषि विज्ञान केंद्रामार्फत मोफत सात दिवसीय निवासी ‘मधुमक्षिका पालन प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत हे शिबीर दिनानक ११ ते १७ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत होईल. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी मर्यादित प्रवेश क्षमता आहे. इच्छुक शेतकरी, युवक युवतींना या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी श्री. ऋषिकेश पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर (७३८५ २७२ ४०९) संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.             जनसपंर्क अधिकारीयशवंतराव ...
02/02/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक वृतपत्रात प्रकाशित झालेले वृत्त.

जनसपंर्क अधिकारी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीलाएक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी...
02/02/2026

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा
३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला
एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त समारंभ येत्या बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठ आवारात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह व न्याय विभाग) तथा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद - एनसीव्हीईटी (NCVET - National Council for Vocational Education and Training) चे माजी अध्यक्ष डॉ. निर्मलजित सिंह कलसी (सेवानिवृत्त आय.ए.एस.) हे उपस्थित राहून स्नातकांना दीक्षान्त भाषण देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे राहणार असून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती असणार आहे. यावर्षी विद्यापीठाचे एकूण एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थी पदवी प्राप्त करीत आहेत. त्यात ७७ दृष्टीबाधित, राज्यातील विविध कारागृहातील ६८ बंदीजनांसह ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभामध्ये ऑनलाईन नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे व परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील १४ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि सुमारे १६८४ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जात आहे. या ३१ व्या दीक्षान्त समारंभांसाठी पीएच. डी., पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमांतील एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे.
३१ व्या दीक्षान्त समारंभाची वैशिष्ट्ये :–
• १ लाख २३ हजार ९२१ पैकी पदविकाधारक १२ हजार ६३७, पदवीधारक ९० हजार ७०८, पदव्युत्तर पदवीधारक २० हजार ५७१, पीएच. डी. धारक - ५ विद्यार्थी. ७१ हजार ७९१ पुरुष व ५२ हजार १३० स्त्री विद्यार्थी. पदवीधारकात ६० वर्ष वयावरील २०८ विद्यार्थ्यांचा समावेश.
• या दीक्षांत समारंभापासून विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी पदवी व पदविका प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर १६ अंकी अपार / एबीसी आयडी अंकित राहील. तसेच त्यावर ब्लॉकचेन प्रणालीवर आधारित क्यूआर कोड छापलेला असून, तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल.
• NAD अंतर्गत डीजीलॉकर पोर्टलवर पदवी/पदविका प्रमाणपत्राची डीजीटल ई-कॉपी दीक्षान्त समारंभ संपल्यानंतर लगेचच उपलब्ध राहणार आहे. याव्यतिरिक्त पदवी / पदविका प्रमाणपत्राची डीजीटल कॉपी, ई-सुविधा मोबाईल ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा रंगीत फोटो व आईचे नाव देखील असणार आहे.
• विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मदतकक्ष, हिरकणी कक्ष व सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्नातकांसाठी महत्वाची सूचना ;- या दीक्षान्त समारंभासाठी ऑनलाइन नोंदणी करून ज्या स्नातकांनी शालसाठी अनामत रक्कम रु. ५००/- भरलेली आहे. फक्त अशा स्नातकांनाच शाल देण्यात येईल. संबंधित स्नातकांनी अनामत रक्कम भरल्याची पावती विद्यापीठातील परीक्षा विभागात दाखवून सकाळी ०८.०० ते ०८.४५ वाजेच्या दरम्यान शाल प्राप्त करून घ्यावी व स्नातकांनी पांढरा शुभ्र पोशाख व शाल परिधान करून सभामंडपात सुरक्षितेच्या दृष्टीने सकाळी ०९.०० वाजता स्थानापन्न व्हावे. स्नातकांना समारंभाच्या शिष्टाचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व सूचना https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=28329 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या समारंभाचे थेट प्रक्षेपण हे विद्यापीठाच्या https://youtube.com/ या अधिकृत युट्यूब चॅनेलवर व https://www.facebook.com/ycmouniversity या फेसबुक पेजद्वारे करण्यात येणार आहे.
दीक्षान्त समारंभासाठी मोफत वाहन व्यवस्था :-
सर्व स्नातकांना विद्यापीठात दीक्षान्त समारंभ स्थळी पोहचता यावे याकरिता विद्यापीठातर्फे विनामूल्य बस व टेम्पोट्रॅव्हलर वाहनाची सोय करण्यात आलेली आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बारदान फाटा (गंगापूर रोड) ते विद्यापीठ व दीक्षान्त समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान विद्यापीठ ते बारदान फाटा अशी वाहतूक व्यवस्था राहील. विद्यार्थ्यांनी या समारंभाच्या अधिक माहिती साठी www.ycmou.ac.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी. काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

01/02/2026

Address

YCMOU, Dnyangangotri, Govardhan, Near Gangapur Dam
Nashik
422222

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik - YCMOU posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share