24/04/2023
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन "सृजनोत्सव, भावी शिक्षकांचा!!! 2023" हा कार्यक्रम रविवार, दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सन्माननीय सचिव श्री वैभवशेठ तांबे व प्रमुख अतिथी म्हणून शिवनेरी भूषण मा. श्री. रमेश खरमाळे हे उपस्थित होते. श्री. बशीर शेख, श्री. कैलास करपे सर व शिल्पकार श्री. यतीन शेटे हे मान्यवर देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये वर्षभरातील विविध स्पर्धा व कार्यक्रम यांच्या बक्षीस वितरणाचा समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. रमेश खरमाळे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होत असलेले नुकसान व पर्यावरण संवर्धनाची गरज याबद्दल विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्याचे काम केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसुदेव राऊत यांनी केले, महाविद्यालयांच्या अहवाल वार्षिक अहवालांचे वाचन डॉ. रमेश काकड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अजय हांडे व अर्चना साबळे यांनी केले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचा सहभाग दिला.