05/03/2025
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे न्यू इंग्लीश स्कूल व ज्यू कॉलेज, कवडदरा येथे ‘स्कूल कनेक्ट २.०’ अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी विंचूर दळवी महाविद्यालयातर्फे कवडदरा ज्यू. कॉलेज ला एक बेलाचे रोप भेट देण्यात आले. शाळेने तत्काळ वृक्षारोपण करून विंचूर दळवी महाविद्यालयाची भेट सहृदय स्वीकृत केल्याचे दाखवले. प्रा. एस. ए. घेगडमल, प्रा. एस. बी. भारुटे, प्रा. जे. आर. बऱ्हे, प्रा. एच एस. लहारे व प्रा. ए. बी. अवचारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. ए. बी. अवचारे यांनी ‘राष्टीय शैक्षणिक धोरण’ म्हणजे नेमकं काय यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. जुने शैक्षणिक धोरण व नवीन शैक्षणिक धोरणातील फरक त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून देऊन नवीन शैक्षणिक धोरणाने देशात अमुलाग्र बदल होणार असल्याचे सांगितले.
प्रा. एस. ए. घेगडमल यांनी कला शाखेतील, प्रा. एस. बी. भारुटे यांनी वाणिज्य शाखेतील व प्रा. जे. आर. बऱ्हे यांनी विज्ञान विभागात झालेल्या बदलांबाबत भाष्य केले. व विद्यार्थ्यांनी उपस्थीत केलेल्या शंकांचे निराकरणही त्यांनी केले.
.0 #शैक्षणिककार्यशाळा #विद्यार्थीमार्गदर्शन #राष्ट्रीयशैक्षणिकधोरण #वृक्षारोपण #शिक्षणसमृद्धी #ज्ञानसंपन्नता #विद्यार्थीविकास