29/02/2020
विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात व्हावा या उद्देशाने एकदिवसीय उद्योजकता प्रोत्साहन शिबीर व प्रदर्शनाचे दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी, अन्नधान्य, औद्योगिक, आरोग्य व तंत्रज्ञानयुक्त स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता विविध प्रकारचे स्टॉल, प्रदर्शनात असणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योग व स्वयंरोजगार यांचे प्रोत्साहन प्रदर्शन असणार आहे.
अवश्य भेट द्या, आणि या पिढीला स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करा !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.