16/04/2026
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व विनाअनुदानित शिक्षक संघटना (ASTEP) तसेच क्रांती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज माननीय महापौर महोदया यांची भेट घेऊन शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीदरम्यान शासनाकडून सोपविण्यात आलेल्या जनगणना, बी.एल.ओ. व एस.आर.ए. संदर्भातील कामांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मुद्दे मांडण्यात आले. यावर सकारात्मक चर्चा होऊन संबंधित विषयांवर योग्य निर्णय घेण्यात आले.