Shree Warana Vidyalaya, Warananagar

Shree Warana Vidyalaya, Warananagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Warana Vidyalaya, Warananagar, College & University, A/P-Wranananagar, Tal-Panhala, Dist-Kolhapur-416113, Warananagar.

12/12/2023

*साल होत १९९१* ...
नुकताच वारणा विद्यामंदिर मधून प्रवेश झाला वारणा विद्यालयात.. अर्थातच इयत्ता पाचवी मध्ये.. खणीवरच्या झोपडीत आम्ही रहायला. (तीच खण मुजवून आत्ताचे नीळकंठेश्वर गार्डन उभारले आहे) कारखाना सुरू असायचा आणि आम्ही गाडी अड्ड्यातन ऊस खात खात शाळेत यायचो ... सगळ्या चोयकाट्या रस्त्याच्या दुतर्फा टाकत टाकत... असे अनेक दिवस सुरू होते.. आणि आमचं गँग पणं लई मोठं अगदी माझ्या पाचवी पासून ते दहावी पर्यंतची... आणि कारखाना कर्मचाऱ्याच्या पोरा पासून ते अधिकाऱ्यांचे पोरा पर्यंत.... संख्या सुध्दा थोडी नाही बर.. चांगली सतरा अठरा जण... रस्त्यानं चालताना साखळी पद्धत.. सरळपणान वाट म्हणून कुणाला दिलेली काही आठवत नाही..

त्यातल्याच एकान कुणीतरी एकेदिवशी मा. प्राचार्य महोदयांच्या कडे आमच्या ऊस खात्या गँग ची तक्रार केली... पोरांचं हे टोळकं लई वांड हाय सगळ्या रस्त्यान ऊस खाईत जात्यात ...

हा पणं अशा मोगम माहिती वर *प्राचार्यांनी कधी विश्वास ठेवला नाही... त्यांच्या बंगल्याच्या बागेतून ( आत्ताचे जनसंपर्क कार्यालय- पूर्वीचा प्राचार्यांचा बंगला ) त्यांनी आमच्यावर एक दिवस पाळत ठेवली... खरचं आमच्या प्रत्येकाच्या हातात उसाची कांडकी आणि तोंडाचा पट्टा चालू... चोयकाट्या सगळ्या गावभर... संगतीला पैज लावून सगळ्यात लांब कुणाची चौयकाटी निघत्या तेची चर्चा अस करत करत शाळेच्या गेट वर राहिलेलं पेर टाकल आणि शाळेत आलो... मागोमाग झाडाच्या आडोशाान डाव्या हातावर कोटाची घडी टाकलेले प्राचार्य महाशय पणं आले... आणि आमच्या लांब लचक गँग ला अडवून ठेवलं . तशी माझ्यासारखी दोन चार नवीनच पण बाकी जून्यांची बोबडी वळली.. प्रार्थना नाही आणि काही नाही पोर्च मध्ये पाठीवरची दप्तर ठेवायला सांगितली... देशमुख शिपाई मामाना बोलवलं आणि १०-१२ खराटे.. झाडू.. सूपली.. आणि कचरा कुंड्या आणायला सांगितल्या... आणि काय सांगायचं दिवसभर खण ते शाळा अख्खी वारणा लोटायची शिक्षा सुनावली.. बर आम्ही ठीक आहे हो.. पण आमच्या गँग मध्ये कारखाना अधिकाऱ्यांची पणं मुल होतीत... त्यांनी त्यांच्या पोरांना रस्ते लोटताना बघितल.. पोराजवळ येऊन चौकशी केली.. जस शिक्षेच कारण समजल .. तस त्यांनी तात्यासाहेबांना गाठल आणि हकीकत सांगितली क्षमा याचना केली.. पोराला लोटायला लावू नका म्हणून विनवणी केली... तात्यासाहेबांनी सगळ ऐकून घेतलं पणं शिक्षा ज्यांनी केलीय त्या प्राचार्य महाबळेश्वर वाला यांना तुम्ही स्वतः जाऊन भेटण्याचा सल्ला दिला..

तात्यासाहेब यांच्या जवळ हक्कान जाणारी ती अधिकाऱ्यांची पावल .... प्राचार्य महोदयांच्या कडे मात्र वळू शकली नाहीत.. पोराला शिक्षा हि भोगावीच लागली..

झाडू खराटा सुपली.. वारणानगरी स्वच्छतेने दुमदुमली

हा होता मा.प्राचार्य महाबळेश्वर वाला यांचा शिस्तबद्धतेचा दरारा ज्यातून कोणीही सुटू शकत नव्हते...

( टीप:- या गँग मधील पोरांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे... कारण ती पोरं आज सर्वजण मान्यवर आहेत.. आणि या ग्रुप वर पणं आहेत .. त्या सर्वांनी वाचा आणि स्वतः च स्वतः ला म्हणा...
होय तो मीच आहे.. )
🙏🙏🙏

13/09/2023
Teachers Day 2023..Students and Best School Friends -1996 BatchPresented 70 Sonchafa Plants To Our School....Thank you t...
08/09/2023

Teachers Day 2023..

Students and Best School Friends -1996 Batch
Presented 70 Sonchafa Plants To Our School....

Thank you teachers and friends for helping us to make this event successful..

Happy Teachers Day.2023.

30/07/2023

2cr Profit

07/06/2023

Let's take a moment to praise them. Pic credit: For a Change.

05/06/2023
29/07/2020

‪दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या ‬
‪माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे‬
‪मनःपूर्वक अभिनंदन! ‬
‪भावी जीवनासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!‬

Address

A/P-Wranananagar, Tal-Panhala, Dist-Kolhapur-416113
Warananagar
416113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Warana Vidyalaya, Warananagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share